काय आहे महाराष्ट्रात सत्तासंघर्ष व राजकारणाची उलथापालथ !

मुंबई : (NZI वृत्तसेवा ) – याआधी सध्याच्या मुख्यमंत्र्यांमुळे महाविकास आघाडीचे सरकार गेले. आता भाजपसाठी शिंदे गट हा बिनकामाचे ओझे झाला आहे. हे ओझे कसे फेकता येईल यावर महाराष्ट्र आणि दिल्लीत चर्चा सुरू आहे. आश्चर्य म्हणजे कालचे बाहुबली देवेंद्र फडणवीस हे राज्यातील या सगळ्या उपक्रमातून बेपत्ता झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे राज्यात सर्वात मोठी उलतापालथ ही भाजपमध्ये सुरू आहे की काय? अशी शंका घ्यायला जागा आहे, असा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे. कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादी फोडून स्वत:चे घर भरायचे काम सुरू आहे. भाजपची काँग्रेसवरही वाईट नजर आहे. अजित पवार यांच्या वावड्या आणि रेवड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू चित्र आज सर्वत्र पहावयास दिसत आहे . पण अजित पवारांनी हे कारणस्थान उधळून लावले आहे, असं म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या चार दिवसांपासून सुरू आहेत. अजितदादा 40 आमदार घेऊन भाजपसोबत जाणार असल्याचं सांगितलं जात असल्याच्याही चर्चा होत्या. या चर्चांना खुद्द अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. याच मुद्द्यावरून दैनिक ‘सामना”च्या अग्रलेखातून हल्ला चढवण्यात आला आहे. शिंदे गट म्हणजे बिनकामाचे ओझे झाले आहे. त्यांना दूर करण्यासाठीच भाजपचे प्रयत्न सुरू आहेत, असं सांगतानाच अजितदादा यांच्याबाबत वावड्या आणि रेवड्या उडवण्यात आल्या. पण अजितदादांनीच त्याला पूर्णविराम दिल्याचं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे. तसेच राज्यातील सर्वात मोठी उलथापालथ भाजपमध्येच सुरू असल्याचा दावाही अग्रलेखातून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य सध्या वावड्या आणि रेवड्या उडवण्यता आघाडीवर आहे. अजित पवार यांच्याबाबतही अशाच वावड्या उडवल्या. ते भाजपसोबत जाणार आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणार आहे, अशा वावड्या उडवण्यात आल्या. राज्यातील राजकारण ढवळून निघणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं. अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली असून त्यांच्याकडे 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र असल्याचंही माध्यमांवर सांगण्यात आलं. पण अजितदादांनी या चर्चांना तिलांजली दिली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं, असं दैनिक ‘सामना’तील अग्रलेखात म्हटलं आहे.
बावनकुळे आणि शेलार वेलदोडे
वावड्या उठवणाऱ्यांनी राजकीय भान ठेवायला हवे, असा सल्लाही सामनातून देण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गंमतीशीर गृहस्थ आहेत. त्यांच्या विधानाकडे निव्वळ गंमत म्हणून पहावे लागते. महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले. ते दोन नेते कोण तर बावनकुळे आणि आशिष शेलार. म्हणजे अजित पवारांसारख्या बलदंड नेता 40 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करतोय. त्याबाबत चर्चा करायला दिल्लीत कोण जात आहेत तर हे दोन वेलदोडे तेव्हा कोणत्या वावड्या किती गंभीर्याने घ्यायच्या? अशा खोचक टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
या सर्व घडामोडीमुंळे सोशल मिडीयावर मात्र सरकार व विविध पक्षांबाबत सत्ता हेच समीकरण झाल्याने सर्वांनी एकत्र येवून सत्ता स्थापन करा व जनतेलाच विरोधात बसवा अशा खोचक टिका पहावयास मिळत आहे .



