अन्य

विज मीटरचे नविन कनेक्शन जोडणीसाठी १५०० रुपयाची लाच घेतांना टेक्निशियन ACB जाळ्यात

विज मीटरचे नविन कनेक्शन जोडणीसाठी १५०० रुपयाची लाच घेतांना टेक्निशियन ACB जाळ्यात

 

जळगाव (प्रतिनिधी ):-

यशस्वी सापळा कारवाई
▶️ युनिट – जळगाव.
▶️ तक्रारदार- पुरुष,वय- २७
रा.जळगाव ता.जि.जळगाव.
▶️ आलोसे-
१) विनोद उत्तम पवार, वय-३२ वर्ष, सिनीयर टेक्नीशियन, म.रा.वि.वि.कंपनी लि.फत्तेपूर ता.जामनेर, जि.जळगाव. (वर्ग-३)
रा.फत्तेपूर, ता.जामनेर जि.जळगाव.
२) कलिम सलीम तडवी , वय-२७ वर्ष, खाजगी इसम, रा.देऊळगाव, ता.जामनेर जि.जळगाव.
▶️ लाचेची मागणी- १५००/-रु .
▶️ लाच स्विकारली- १५००/-रू.
▶️ हस्तगत रक्कम- १५००/-रू.
▶️ लाचेची मागणी –
दि.१९/०४/२०२३
▶️ लाच स्वीकारली
दि.१९/०४/२०२३ रोजी
▶️ * लाचेचे कारण-*
यातील तक्रारदार हे तोरनाळे ता.जामनेर येथील मुळ रहीवासी असून ते सध्या जळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्तक्रारदार यांना तोरनाळे ता.जामनेर या त्यांच्या मुळगावी तोरनाळे ता.जामनेर ग्रामपंचायतीच्या त्यांच्या वडीलांच्या नावे असलेल्या बखळ जागी त्यांनी तयार केलेल्या पत्र्यांच्या शेडमध्ये विज मीटरचे नविन कनेक्शन घ्यायचे होते. म्हणून तक्रारदार म.रा.वि.वि.कंपनी लि.फत्तेपूर कार्यालयात जावून विज मीटरचे नविन कनेक्शन मिळणेसाठी विचारपुस केली असता सदर कार्यालयातील कर्मचारी सिनीयर टेक्नीशियन विनोद पवार व खाजगी इसम कलीम तडवी यांनी तक्रारदार यांना विज मीटरचे नविन कनेक्शन मिळणेसाठी ज्यांच्या नावे कनेक्शन घ्यायचे आहे त्यांचे आधारकार्ड, ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला, १००/- रुपयांचा स्टॅम्प पेपर व डिमांडनोट, साहेबांचे व आमचे असे एकुण ३,५००/- रुपये लागतील असे सांगितले व त्याचवेळी डिमांडनोट भरणेसाठी तक्रारदार यांचेकडून २,०००/-रुपये घेतलेले होते. व आज विज मीटरचे नविन कनेक्शन जोडणीसाठी आरोपी क्रं.१ व २ यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष साहेबांचे नावाने उर्वरीत १५००/- रुपयांची लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम पंचासमक्ष स्वतः आलोसे क्रं.१ यांनी फत्तेपूर गावातील बुलढाणा ते जामनेर रोडवरील बुलढाणा अर्बन बँकेच्या शेजारील बंद दुकानाजवळ स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. म्हणून दोन्ही आरोपीतांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा व तपास अधिकारी-
श्री.शशिकांत पाटील,
पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.
मो.नं. 8766412529
▶️ सापळा पथक-
पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने.
▶️ कारवाई मदत पथक-
PI.संजोग बच्छाव,
मो.नं.98231 28038
स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.
▶️ मार्गदर्शक-
1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मो.नं. 93719 57391
2) मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मो.नं. 9823291148
3) मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मो.नं. 9822627288
▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी-
मुख्य अभियंता,म.रा.वि.वि.कंपनी लि.जळगाव.
—————————–
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
@ मोबा.क्रं. 8766412529
@ टोल फ्रि क्रं. 1064

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button