खरेदी खतातील काही पेजेस हरविल्याबाबत जाहीर नोटीस
खरेदी खतातील काही पेजेस हरविल्याबाबत जाहीर नोटीस
जाहिर नोटीस –

दि.२७/०३/२०२५ तमाम लोकांना, राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, खाजगी बँका, वित्तीय संस्था, पतसंस्थांना तसेच कांताबाई सिताराम तेली रा. पिंपळगाव बु. ता.पाचोरा जि. जळगाव यांना व त्यांचे कुटूंबातील सदस्यांना, घटकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की,
१) आमचे अशिलाचे मालकीची मौजे पिंपळगाव बु. ता. पाचोरा येथील बिनशेती गट नंबर ७०५ पैकी प्लॉट नं.१२ क्षेत्र-१३३.५४ चौ.मी. येणेप्रमाणेची प्लॉट मिळकत हि कांताबाई सिताराम तेली यांचे मालकीची व कब्जेउपभोगातील आहे. सबब वर नमुद मिळकतीचे दि.२६ नोव्हेंबर १९९८ रोजी रजि. खरेदीखत दस्त क्र.२७७६/१९९८ सह. दुय्यम निबंधक वर्ग-२ पाचोरा यांचेकडे नोंदणीकृत रजि. खरेदीखत केले आहे. सदर दस्तात पेज नं.१ ते ७ असुन त्यापैकी पेज क्र.७ हे रस्त्यावर कोठेतरी दि.२५/०२/२०२५ रोजी पडून गहाळ झालेले आहे, त्यांनी शोध घेतला असता दस्तातील पेज नं.७ मिळुन आले नाही. सदर मिळकतीचे हल्लीचे मालक सुनिल सिताराम तेली हे वर नमुद मिळकत तारण देवून अॅक्सीस बैंक लि. शाखा-पाचोरा यांचेकडून कर्ज प्रकरण देखील करीत आहे. तरी याबाबत देखील कुणाचीही हरकत, तक्रार, आक्षेप असल्यास त्या संदर्भात देखील या नोटीसीने कळविण्यात येत आहे.
२) वर नमुद मिळकतीचे पेज नं.७ गहाळ झाल्यानंतर आजपावेतो सापडलेले नाही, मिळून आलेले नाही, तरी मुळ दस्तातील पेज नं. ७ कुणाकडे असल्यास आणुन देण्यासंदर्भात देखील ही नोटीस प्रसिध्द केली आहे. तरी सदर गोटीस प्रसिध्द झाल्यापासुन ०७ दिवसांच्या आत आमचे अशिलाशी संपर्क साधावा. तरी ७ दिवसानंतर अक्षेप हरकत विचारात घेतली जाणार नाही, येणेप्रमाणे जाहिर नोटीस प्रसिध्दीस दिली असे.
ता.२७/०३/२०२५
जाहीर नोटीस देणाराची सही
सदरची जाहीर नोटीस पक्षकाराने दिलेल्या माहिती, कागदपत्र व अधिकारावरुन आमचे मार्फत प्रसिध्दीस दिली असे.
ॲड. पी.बी. पाटील, पाचोरा पाचोरा, ता. पाचोरा जि. जळगाव



