वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना शाखा पाचोरा कार्यकारणी गठीत!

वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना शाखा पाचोरा कार्यकारणी गठीत
पाचोरा (प्रतिनिधी) – नुकतीच वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष श्री विठ्ठल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली रामदेव लॉन्स पाचोरा येथे नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली राजेंद्र काशिनाथ राठोड नवनियुक्त तालुका अध्यक्ष यांनी प्रास्ताविक केले व सूत्र संचालन संघटनेचे नवनियुक्त सचिव राजेंद्र बबन राठोड यांनी केले .प्रथम जिल्हास्तरावरून आलेल्या मा . जिल्हाध्यक्ष व त्यांच्या समवेत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले तर नंतर मा. जिल्हाध्यक्ष यांनी नवीन कार्यकारणी घोषित करत संबंधित अध्यक्ष सदस्य यांना त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले .तदनंतर नवनियुक्त तालुकाध्यक्ष राजेंद्र काशिनाथ राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले . पुढील काळात संघानेच्यामाध्यमातून संघटनात्मक चांगले कार्य करू असे आश्वासन नवनियुक्त तालुका अध्यक्ष राजेंद्र काशिनाथ राठोड यांनी दिले .
तदनंतर अनारसिंग राठोड , वासुदेव चव्हाण यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करत संघटनेला मजबूत व बळकट करण्याचे काम करू असे म्हटले .
शेवटी मा . जिल्हाध्यक्ष जाधव सर यांनी आपले मनोगत द्वारे संघटनेचे ध्येय धोरण उद्दिष्ट व्यक्त करत नवीन कार्यकारणीला पुढील कामकाजासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या . जामनेर तालुक्यातील तालुका अध्यक्ष श्री बन्सीलाल भाऊ यांनी संघटनेचे कार्य कसे चालते याविषयी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या समवेत आलेले जामनेर तालुक्याचे कार्याध्यक्ष श्री रमेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले प्रसंगी नवीन तालुका कार्यकारणी ची खालील प्रमाणे निवडण्यात आली
1) राजेंद्र काशिनाथ राठोड अध्यक्ष
2) वरून हिम्मत सिंग जाधव उपाध्यक्ष
3) राजेंद्र बबन राठोड सचिव
4) कैलास हरसिंग राठोड सहसचिव
5) अरुणा सवाई लाल राठोड महिला कार्यकारणी सदस्य
6) वासुदेव मानसिंग चव्हाण कोषाध्यक्ष
7) अनुसया हरिभाऊ राठोड संघटक महिला
8) घनसाराम प्रभू राठोड खजिनदार
9) अनारसिंग मखराम राठोड कायदेविषयक सल्लागार
10) पितांबर नरसिंग राठोड जेष्ठ कार्यकारी सदस्य
11) सिताराम बाबु सिंग पवार ज्येष्ठ कार्यकारी सदस्य
12) प्रकाश निंबा चव्हाण जेष्ठ कार्यकारी सदस्य
13) सुभाष रामदास राठोड कार्यकारणी सदस्य
14) प्रदीप बालचंद राठोड प्रसिद्धी प्रमुख
15) मंजू जगन राठोड महिला कार्यकारणी सदस्य
16) रंजना दरबार राठोड महिला कार्यकारी सदस्य
17) कविता संतोष चव्हाण महिला कार्यकारी सदस्य वरील प्रमाणे नवनियुक्त पाचोरा तालुका कार्यकारणी जिल्हाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सर्वांना नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले 💐 प्रसिद्धीप्रमुख प्रदीप भालचंद्र राठोड यांनी सभेचा समारोप केला व खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.



