खान्देश

पाचोरा पोलिस स्टेशनचे सिंघम सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी अवैध गुटखा पकडून केली मोठी करवाई*

*पाचोरा पोलिस स्टेशनचे सिंघम सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी अवैध गुटखा पकडून केली मोठी करवाई*

पाचोरा — आज दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी सकाळी चार वाजेदरम्यान जळगांव रोड वरील वरखेडी नाका येथे पाचोरा पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान एप्रिल महिन्यात सुरवातीलाच एक महत्त्वपूर्ण कारवाई करत अवैध गुटखा वाहतूक करणारे वाहन जप्त केले बाबतची माहिती प्राप्त झाली आहे. सदर कारवाईत जवळपास 40 ते 50 लाख रुपये किमतीचा गुटखा व एक मोठे वाहन जप्त देखील जप्त करण्यात आले असून शहरातील पोलिसांच्या रात्रीच्या गस्त व नाकाबंदी दरम्यान अवैध गुटखा वाहतुकीला आळा घालण्याच्या दिशेने हे एक अनेक गुटखा किंग यांचे धाबे दणानणार म. जप्त केलेल्या वाहनाची आणि गुटख्याची सविस्तर तपासणी पोलिसांच्या वतीने सुरू असून या घटनेमुळे पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेचे आणि अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवले जाणार असून. सिंघम कारवाई पाचोरा पो स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी पोलिस कॉन्स्टेबल राहुल शिंपी,सुनील पाटील व समीर पाटील, मनोहर पाटील यांच्या मदतीने केली आहे. सदर जप्त केलेले वाहनाचा मालक पाचोरा येथील असल्याचे व वाहन पकडल्याने अनेक दिग्गज लोकांचे मध्यस्थी साठी फोन आल्याचे कळते परंतु सहाय्यक पोलिस निरीक्षक भदाणे यांनी मात्र कोणालाही थारा न देता पथकास सोबत घेऊन ही कारवाई केल्याने पाचोरा शहरात पोलिसांची प्रतिमा उंचावली असून गुटखा विक्री करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहे.

सविस्तर लवकरच

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button