खान्देश

संजय गांधी निराधार योजना अनुदान त्वरित मिळावे माजी अध्यक्षा योजना पाटील सह सदस्यांची मागणी!

संजय गांधी निराधार योजना अनुदान त्वरित मिळावे माजी अध्यक्षा योजना पाटील सह सदस्यांची मागणी
भडगांव (प्रतिनिधी) : शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदान लाभार्थ्यांना 1 जुलै पासून मिळाले नाही. सदर योजनेत श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, विधवा, परित्यक्त्या महिला, दिव्यांग आदि योजनेचे लाभार्थी सतत चौकशी करीत आहेत. दिवाळी सणापुर्वी मागील तिन महीने व ऑक्टोबर महिन्यासह चार महिन्याचे अनुदान सुधारित 5 जुलै 2023 च्या जीआर नुसार 500 रुपये वाढ प्रमाणे 1500 रुपये अदा करावेत. अशी मागणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माजी अध्यक्षा योजना पाटील, दक्षता समिती उपाध्यक्षा मिना बाग, सदस्या रेखा पाटील, कल्पना पाटील आदि महिला प्रतिनिधींनी नायब तहसीलदार रमेश देवकर व महसुल नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे यांना निवेदनद्वारे केली आहे. दरम्यान नायब तहसीलदार रमेश देवकर व राजेंद्र अहिरे यांनी सांगितले की याअंतर्गत काही योजनांचे एक महिन्याचे अनुदान आले आहे ते लवकरच नवीन वाढीव जीआर नुसार रू. पंधराशे प्रमाणे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल. उर्वरित वाढीव अनुदानाची मागणी केली आहे तेही दिवाळी सणापुर्वी मिळेल असे निवेदन प्रसंगी नमूद केले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button