क्राईममहाराष्ट्र

आदिवासी बालिका मृत्यू प्रकरणी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारा विरुद्ध दिलेल्या तक्रारीचा निषेध

आदिवासी बालिका मृत्यू प्रकरणी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारा विरुद्ध दिलेल्या तक्रारीचा निषेध

पाचोरा, दि. १८ नोव्हेंबर २०२३ : पाचोरा शहरातील वृंदावन हॉस्पिटलमध्ये १५ दिवसाच्या बालिकेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप करून याप्रकरणी एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ यांनी १४ नोव्हेंबर रोजी रात्री तक्रार अर्ज देऊन कारवाईची मागणी केली होती. तसेच दिनांक १६ नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन सदरचा प्रकार प्रसार माध्यमांना सांगितला होता. याविषयाची येथील पत्रकाराने बातमी सोशल मिडियावर लावल्याने वृंदावन हॉस्पिटलचे संचालक यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये संबंधित पिडित कुटुंब, सुधाकर वाघ व वार्तांकन करणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आषयाचा तक्रारी अर्ज दिला आहे.

या अर्जाच्या निषेधार्थ तसेच या प्रकरणाची दोन्ही बाजूने सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी १७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाखडा, तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर, शहर अध्यक्ष प्रविण ब्राम्हणे, तालुका उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, राहुल महाजन, दिलीप जैन, अनिल (आबा) येवले, राकेश सुतार, कुंदन बेलदार, भिकन पाटील, दिलीप परदेशी, रविशंकर पांडे, जावेद शेख, दिलीप एम. पाटील, गजानन गिरी, परशुराम नाईक उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, वार्तांकन करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असून अन्यायकारक वाटणाऱ्या घटनेला वाचा फोडून पीडितांची बाजू जनतेसमोर आणणे हा पत्रकार म्हणून आमचा अधिकार असून आमची नैतिक जबाबदारी आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करून पीडितांच्या अर्जान्वये निष्पक्ष पाने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्या पत्रकार संघाच्या वतीने  सांगितले की, वृंदावन हॉस्पिटलचे संचालक  यांच्या तक्रारीचा निषेध करतो. वार्तांकन हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असून त्यावर कोणतीही मर्यादा घालणे चुकीचे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडितांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी सांगितले की, वृंदावन हॉस्पिटल विरुद्ध आलेल्या तक्रारीची चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button