क्राईम

पाचोरा पोलीस मल्हार देशमुख व सचिन निकम यांची उत्कृष्ट कामगिरी ३९४ मधील गुन्हेगारांना शिताफीने पाचोरा येथे घेतले ताब्यात!

पाचोरा पोलीस मल्हार देशमुख व सचिन निकम यांची उत्कृष्ट कामगिरी ३९४ मधील गुन्हेगारांना शिताफीने पाचोरा येथे घेतले ताब्यात!

पाचोरा पोलीस मल्हार देशमुख व सचिन निकम यांची उत्कृष्ट कामगिरी ३९४ मधील गुन्हेगारांना शिताफीने पाचोरा येथे घेतले ताब्यात! सविस्तर वृत्त असे, रामानंद नगर पोस्टे जळगांव गुरनं. 200/2023 भादवि कलम 394 प्रमाणे दाखल असुन सदर गुनहयातील संशयीत आरोपी 1 उमेश गोकुळ राठोड व त्याचा भाउ राकेश गोकुळ राठोड दोन्ही समतानगर जलगांव हे पल्सर मोटार सायकल ने जलगांव येथून पाचोरा रोडने पाचो-याच्या दिशेने निघाले आहेत याबाबत रामानंद नगर पोलीस सटेशन यांचे कडुन माहीती मिळाल्याने लागलीच पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष  पो.ना./2409 विश्वास देशमुख व पो.ना./ 2157 सचिन निकम तात्काळ जारगांव चौफुली येथे जावुन यांनी नाकाबंदी केली असता त्यांना एका पल्सर मोटार सायकलवर वर्णन सांगीतल्याप्रमाणे दोन जण येतांना दिसल्याने त्यांनी सदरची मोटार सायकल अडवुन त्यांना विचारपुस केली असता ते उडवा उडवीचे उत्तर देत होते. यामुळे अजूनच संशय बळावला म्हणून  त्यांना पाचोरा पोलीस स्टेशन ला आणुन त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नांव उमेश गोकुळ राठोड व त्याचा भाउ राकेश गोकुळ राठोड दोन्ही रा. समतानगर, जळगाव असे सांगीतले. पाचोरा कर्त्यव्य दक्ष पोलीस व जळगाव येथून त्यांचा मागुन पाठलाग करत येत असलेले पो.ना./2050 किशोर पाटील, पो.कॉ./3142 छगन तायडे, पो.कॉ./342 किरण पाटील नेम. एम आय डी सी पोलीस सटेशन जळगांव तसेच पो.हे.कॉ /1356 विजय खैरे पो.ना./2995 रेवानंद सांळुखे, पो.कॉ./3388 रविंद्र चौधरी, पो.का. /3323 उमेश पवार असे पाचोरा पोलीस सटेशन ला आलेवर त्यांनी पुढील चौकशीकामी रामानंद पोलीस स्टेशनचे पो. हे. कॉ./ 1356 विजय खैरे यांचे ताब्यात 1. उमेश गोकुळ राठोड व त्याचा भाउ 2. राकेश गोकुळ राठोड दोन्ही रा. समतानगर, जळगांव यांना पल्सर मोटार सायकल क्रमांक MH 19DT 2853  सहताब्यात दिले. पाचोरा पोलिसांच्या या कामगिरीने महिलांच्या अंगावरील दागिने , व चैन चोरांच्या दोन तासातच मुसक्या आवळल्याने संशयित चोर ताब्यात आले. म्हणून पाचोरा पोलीसा स्टेशन चे पी. आय खताळ व डीवायएसपी वेरुळे यांनी कर्मचा-यांच्या कामगिरीवर आनंद व्यक्त करत कौतुकाची थाप दिली. व सर्व सामान्य जनतेतून दोघांचे हि आभार मानले जात आहे .

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button