सौ.सिंधुताई पंडितराव शिंदे,प्राथमिक शाळा व पंडितराव परशराम शिंदे माध्यमिक विद्यालयात योगदिन उत्साहात साजरा!

सौ.सिंधुताई पंडितराव शिंदे,प्राथमिक शाळा व पंडितराव परशराम शिंदे माध्यमिक विद्यालयात योगदिन उत्साहात साजरा!
पाचोरा (डॉ.योगेश पाटील )- सौ.सिंधुताई पंडितराव शिंदे,प्राथमिक शाळा व पंडितराव परशराम शिंदे माध्यमिक विद्यालयात जागतिक योगदिन उत्साहात सकाळी ७.०० ते ८.०० या वेळात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला….
याप्रसंगी शाळेच्या आवारात १) प्रार्थना, २) पूरक हालचाली ३) योगासने -दंड स्थिती, बैठक स्थिती, ४) कपालभाती ५) ध्यान, त्रिवार ओमकार, याप्रमाणे क्रमाने कार्यक्रम घेण्यात आला. प्रार्थनेच्या दरम्यान पाचोरा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील यांनी भेट देवून विद्यार्थ्याचे कौतूक केले.संपूर्ण योगाभ्यास कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक समाधान माधवराव महाजन व माध्यमिक शाळेचे पर्यवेक्षक एम.बी.देशमुख यांनी केले, तर गाईड म्हणून प्राथमिक व माध्यमिक शाळेचे प्रदीप शिंदे व समाधान पाटील सर यांनी आसने करुन दाखविली. अशा प्रकारे त्रिवार ओमकार व प्रार्थना घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तसेच गिरनाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले . कार्यक्रमास इ.१ ली ते ८ वी चे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



