खान्देश

पाचोरा पोलीस स्टेशनचे ट्राफिक पोलीस कर्मचारी सुनील पाटील यांची ASI या पदावरून ग्रेड PSI या पदावर पदोन्नती

पाचोरा पोलीस स्टेशनचे ट्राफिक पोलीस कर्मचारी सुनील पाटील यांची ASI या पदावरून ग्रेड PSI या पदावर पदोन्नती
पाचोरा प्रतिनिधी:- पाचोरा पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक ASI सुनील पाटील यांची ग्रेड PSI पदी नियुक्ती झाली असून त्यांनी पोलीस खात्यात 34 वर्षे विविध ठिकाणी सेवा केली असून त्यांनी जळगांव जिल्हा पेठ , MIDC ,यावल, मारवड ,अडावद ,भडगांव, पाचोरा येथे सेवा केली असून सध्या पाचोरा येथे गेल्या चार वर्षापासून ट्राफिक पोलीस अंमलदार म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.  त्यांनी ट्रॅफिक कर्मचारी सह एक चांगले व्यक्ती पोलिसातील संवेदनशील माणूस म्हणून  भूमिका अत्यंत चोख पणे बजवत असून कोणावर काही अन्याय होणार नाही. याची ते काळजी घेत असतात कोण्याव्यक्ती जवळ गाडीचे कागदपत्र , हेलमेट , ते योग्य सूचना देऊन त्यांना नियमाचे पालन पालन कसे करावे याकरिता जागृत करीत असतात ,  ट्रिपल शीट गाडी जोरात चालविणे तसेच गाडीचा कर्कश आवाज करणारे यांच्यावर योग्य ते कारवाई करत असतात . तसेच सुनील ताराचंद पाटील यांचा हसरा स्वभाव , साधे व्यक्तीत्वमुले ते सर्वांचेच आवडते असून पोलीस खात्यातील एक साधारण व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे रोज नेहमीप्रमाणे आपली ड्युटी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करत असून नियमाचे काटेकोर पालन ते करीत असतात तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार योग्य ती कारवाई करत असतात त्यांनी आपल्या पोलीस खात्यात 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा नंतर शासनाने नुकताच पोलीस स्टेशन अंतर्गत चांगल्या कामगिरी केलेल्या पोलिसांना ग्रेड PSI या पदावर नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button