निर्मल स्कूलच्या विद्यार्थ्यांची पाचोरा पोलिस स्टेशनला भेट — पोलिस ठाण्याचे कामकाज प्रत्यक्ष पाहून घेतले अनुभवातून शिक्षण!

निर्मल स्कूलच्या विद्यार्थ्यांची पाचोरा पोलिस स्टेशनला भेट — पोलिस ठाण्याचे कामकाज प्रत्यक्ष पाहून घेतले अनुभवातून शिक्षण!
पाचोरा (प्रतिनिधी) —
येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता ५ वीच्या १६४ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पाचोरा पोलिस स्टेशनला भेट देत पोलिस ठाण्यातील दैनंदिन कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना पोलिस प्रशासनाचे कार्य, जबाबदाऱ्या आणि गुन्हे शोध प्रणालीचे ज्ञान देणे हा होता.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांचे समाजातील महत्त्व, जनसेवा आणि सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले.
या वेळी पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, हवालदार राहुल शिंपी, योगेश पाटील, तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निकम आणि पीएसआय कैलास ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना विविध विभागांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी गुन्हे प्रकटीकरण कक्ष, संगणक कक्ष, गार्ड रूम, ठाणे अंमलदार कक्ष, बिनतारी संदेश कक्ष, लॉकअप, गुन्हे शोध पथक कक्ष, मुद्देमाल कक्ष, क्राईम रायटर शाखा, गोपनीय शाखा व शस्त्र कक्ष अशा विविध विभागांचे प्रात्यक्षिक पाहून पोलिसांच्या कार्यपद्धतीचा अनुभव घेतला.
शाळेच्या वतीने शिक्षिका शीतल पाटील, तिलोत्तमा सोळंके, मंजूश्री पाटील, जाई पाटील, तसेच शिक्षक गणेश मोरे आणि सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
भेटीच्या शेवटी पोलिस स्टेशनतर्फे विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, समाजसेवा आणि कायदा पालनाचे भान निर्माण झाले असून, पोलिस आणि समाजातील सुसंवादाचे सुंदर उदाहरण घालून दिले गेले.



