भातखंडे घरफोडी करणारा जेरबंद — पोलिसांची झटपट कारवाई, ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ४ तासांत हस्तगत!

भातखंडे घरफोडी करणारा जेरबंद — पोलिसांची झटपट कारवाई, ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ४ तासांत हस्तगत!
पाचोरा पोलिसांचे कौतुकास्पद यश – चोरटा कन्हय्या नामक पोलिसांच्या ताब्यात
पाचोरा (प्रतिनिधी) —
पाचोरा पोलिसांनी पुन्हा एकदा कार्यकुशलता आणि तत्परता दाखवत भातखंडे परिसरातील घरफोडीचा गुन्हा केवळ चार तासांत उकलून चोरासह ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे नागरिकांत पोलिसांबद्दल समाधान आणि कौतुकाची भावना निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भातखंडे (ता. पाचोरा) येथे एका बंद घरात चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादी सोपान कुमावत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. घटनेनंतर पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तात्काळ तपास सुरू केला.
गुप्त माहितीच्या आधारे संशयितावर लक्ष ठेवून पोलिसांनी अचूक सापळा रचून आरोपी कन्हय्या यास काही तासांतच ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून एकूण ४१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईत पोलीस सहा पो.निरीक्षक संजय निकुंभ तसेच कर्मचारी पोलीस नाईक महेंद्र पाटील ,तुषार विसपुते ,पो कॉ .संदीप राजपूत ,जितेश पाटील हरीश परदेशी श्रीराम शिंपी , संतोष राजपूत ,अनिल पवार आदींचा विशेष सहभाग राहिला.
पोलिसांच्या या वेगवान आणि अचूक कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले असून, नागरिकांनीही पाचोरा पोलिसांच्या दक्षतेचे अभिनंदन केले आहे.



