डॉ. टाक यांच्याकडे २ कोटींची मागणी, तर उद्योगपती तथा भाजपा नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्याकडे ३० लाखांची खंडणीची मागणी – दोन महिन्यांत दुसरे धक्कादायक प्रकरण!

पाचोरात खंडणी प्रकरणांची मालिका — दोन महिन्यांत दुसरे धक्कादायक प्रकरण!
डॉ. टाक यांच्याकडे २ कोटींची मागणी, तर उद्योगपती वैशाली सूर्यवंशी यांच्याकडे ३० लाखांची खंडणीची मागणी — नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
*पाचोरा (जि. जळगाव)* — शहरात सलग खंडणी प्रकरणांची मालिका सुरू झाल्याने नागरिक आणि व्यावसायिक वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन महिन्यांच्या अंतराने घडलेल्या दोन मोठ्या प्रकरणांमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी * पाचोरा शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे इन्चार्ज डॉ. टाक* यांच्याकडे अज्ञात व्यक्तींनी तब्बल *२ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा* प्रकार समोर आला होता. प्रकरणाची चौकशी सुरू असली तरी अद्याप ठोस निष्कर्ष लागलेला नाही.
याच पार्श्वभूमीवर आता शहरातील प्रसिद्ध *उद्योगपती वैशाली सूर्यवंशी यांच्याकडे *३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे* प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व भीतीचं वातावरण पसरलं आहे.
शहरातील व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, अशा घटना रोखण्यासाठी *तपास वेगाने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करावी.*
स्थानिकांनी व्यक्त केलेल्या भावना सांगतात, “डॉ. टाक यांच्या दोन कोटींच्या प्रकरणाचा तपास अद्याप अंधारात असताना पुन्हा एक मोठं प्रकरण घडणं हे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतं.”
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचा *सखोल तपास सुरू असल्याचं* सांगत लवकरच गुन्हेगारांना पकडण्याचा *विश्वास नागरिकांना दिला आहे.



