खान्देश

नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेत गोपीचंद पुना पाटील,विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे तनु पाटील व स्वराज चौधरी विजयी…!!!!!!

नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेत गोपीचंद पुना पाटील,विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे तनु पाटील व स्वराज चौधरी विजयी…!!!!!!

कोळगाव ता.भडगाव (वार्ताहर) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत, गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील तथा किसान स्पोर्ट्स अकॕडमीचे खेळाडू कु. तनु वाल्मीक पाटील (४९ किलो,प्रथम) तसेच चि.स्वराज प्रल्हाद चौधरी (ग्रीकोरोमन ६५ किलो,प्रथम) यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी,कार्यालय, नाशिकतर्फे,बलकवडे व्यायामशाळा, भगुर जि.नाशिक येथे आयोजित विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत आपआपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूस चितपट करून यश संपादन केले आहे.
याच स्पर्धेत चि.ओम ज्ञानेश्वर बोरसे (ग्रीकोरोमन ९२ किलो, द्वितीय) उपविजेतेपद प्राप्त केले आहे.
तनु तसेच स्वराज यांची खोपोली जि. रायगड येथे आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेत यश मिळवणाऱ्या कुस्तीपटूंना आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालय सचिव प्रशांतराव पाटील,प्राचार्य अनिल पवार, पर्यवेक्षिका सिमा शिसोदे तसेच शिक्षक-शिक्षकेतर,प्राध्यापक-प्राध्यापिका आदिंनी आनंद व्यक्त करीत व अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button