खान्देश

भाजप नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्याकडे ३० लाखांची खंडणी मागणी – धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

भाजप नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्याकडे ३० लाखांची खंडणी मागणी — धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

पूर्वीही अशीच खंडणी  पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील **वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश टाक प्रकरणाची पोलिसात नोंद तपास मात्र थंड बस्त्यात जाणकारांचे मत!

**पाचोरा | १० ऑक्टोबर | न्यूज झेप इंडिया वृत्तसेवा**
पाचोरा शहरातील भाजप नेत्या **वैशाली सूर्यवंशी** यांना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून धमक्या देत तब्बल **३० लाखांची बेकायदेशीर खंडणी** मागण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी **‘अमन’ नावाच्या इसमाविरोधात** पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

व्हायरल क्लिपची धमकी देत ब्लॅकमेल  :- 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैशाली सूर्यवंशी या सन **२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पाचोरा-भडगाव मतदारसंघातून उमेदवार** म्हणून उभ्या होत्या. दरम्यान, आरोपी अमन या इसमाने विविध मोबाईल क्रमांकांवरून (९५५७४८९८८६, ७४५५०१९४६८, ९२५८८१२१७८, ९१७२४८८५५९६८) फोन करून आणि व्हॉट्सअॅप संदेश पाठवून त्यांना धमक्या दिल्या.

आरोपीने दिली अशी धमकी :-

“तुमच्या संभाषणाची बनावट क्लिप तयार करून ‘पैसे वाटल्याचा’ आरोप सोशल मीडियावर टाकेन. तसेच निवडणूक आयोग, इन्कमटॅक्स, सीबीआय आणि ईडीकडे तक्रार करीन,” अशी धमकी दिली.

याशिवाय आरोपीने “३० लाख रुपये दिल्यास हे सर्व थांबवेन” असे सांगत खंडणी मागितली. पैसे न दिल्यास “गाडीमध्ये ड्रग्ज ठेवून अडचणीत आणेन” आणि “कुटुंबाला त्रास देईन” अशा स्वरूपाच्या धमक्या देत ब्लॅकमेल केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पूर्वीही अशीच खंडणी प्रकरणाची नोंद

या आधीही पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील **वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश टाक** यांच्याकडे **२ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा** गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या प्रकरणाचा तपास अद्याप अपुरा असल्याचे नमूद करत, आता पुन्हा अशीच घटना घडल्याने पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलीस निरीक्षक स्वतः तपास करणार :-

या तक्रारीवरून पाचोरा पोलिसांनी आरोपी **अमन (पूर्ण नाव व पत्ता अद्याप अस्पष्ट)** याच्याविरोधात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर गुन्ह्याचा **तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार** स्वतः करीत आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चा  :- 

या घटनेनंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये मोठी खळबळ माजली असून, पक्ष कार्यकर्त्यांनी “महिला नेत्यांना धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी” अशी मागणी केली आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button