पाचोरा येथे हॉटेल चालकावर चाकू हल्ला गुन्हा दाखल सं.आरोपीस एक दिवसांची पोलीस कोठडी !

पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा येथे चाकू हल्ला गुन्हा दाखल सं.आरोपीस एक दिवसांची पोलीस कोठडी ! हॉटेल मुरली मनोहर चे संचालक यांच्यावर प्राणघातक हल्ला सविस्तर वृत्त असे :- पाचोरा येथे दिनांक २३ रोजी रात्री १० :३० च्या सुमारास हॉटेल मुरली मनोहर या ठिकाणी एक व्यक्ती अचानक आला व हॉटेलच्या किचन मध्ये घुसून धिंगाणा घालू लागला असता . हॉटेल चालक प्रीतेश पाटील यांनी त्यास किचन मध्ये जावू नका तुम्हाला काय लागेल ते मी देतो . परंतु शिवीगाळ करू नका अशी विनंती केली परंतु संबधित व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता . सदरील घटना प्रितेश पवार याने वडिलाना फोनवरून सदरील घटना सांगील्यानंतर राजेंद्र पवार हे होटल मुरली मनोहर या ठिकाणी पोहचले त्यांनी देखील समजविण्याचा प्रयत्न केला असता . त्या व्यक्तीने तेथून जावून अजून काही वेळाने ५-७ लोकांचे टोळके सोबत घेऊन आला व तुम्ही मला ओळखत नाही . व शिवीगाळ करण्यास सुरवात केली . त्यातच त्या व्यक्तीने आपल्या जवळ असलेल्या चाकूने राजेंद्र पवार यांच्या वर सपासप वार करत त्यांना गंभीर दुखापत केली . त्यात ते बेशुद्ध पडून त्यांना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . परंतु परिस्थिती गंभीर असल्याने पाचोरा येथूनही प्रथम उपचार करून छत्रपती संभाजी नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . सदरील घटनेची फिर्याद प्रितेश पवार यांच्या सांगण्यावरून सं आरोपी इंद्रजित पाटील व अन्य पाच जनाविरोधात पाचोरा पोलिसात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अन्वये कलम ११५ (१) , ११८ (२) , ३५२ , ३५१ (२) ,१८९ (२) , १९१ (१) , १९० (३४ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उप निरीक्षक योगेश गणगे , पोलीस उपनिरीक्षक भदाणे करीत आहेत.



