खान्देश
गोकुळाष्टमीनिमित्त कला शिक्षक राजेंद्र भदाणे यांनी साकारले खडूच्या साहाय्याने फलकावर !

गोकुळाष्टमीनिमित्त कला शिक्षक राजेंद्र भदाणे यांनी साकारले खडूच्या साहाय्याने फलकावर !
पाचोरा (प्रतिनिधी) – अप्रतिम चित्र – जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गरताड ता.जि. धुळे,येथील कलाशिक्षक राजेंद्र भदाणे यांनी गोकुळ अष्टमी व गोपाळकाला निमित्ताने कृष्ण भगवानाचे व लहान वासराचे एक प्रेमळ भावनेचे आणि भावनात्मक चित्र दर्शनी फलकावर खडूच्या साह्याने रेखाटले आहे अत्यंत सुरेख व अप्रतिम चित्र पाहून मुलांना व शिक्षकांना आनंद झाला व सर्वांनी कलाशिक्षक राजेंद्र भदाणे यांना मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व काढलेल्या चित्राची स्तुती केली.



