खान्देश

निरोप समारंभ–आदर्श शिक्षक श्री रत्नाकर पाटील व प्रवीण भालेराव सर यांची बदली व नवीन रुजू झालेल्या शिक्षकांचे स्वागत समारंभ संपन्न !

निरोप समारंभ–आदर्श शिक्षक श्री रत्नाकर पाटील व प्रवीण भालेराव सर यांची बदली व नवीन रुजू झालेल्या शिक्षकांचे स्वागत समारंभ संपन्न !!

भारत पाटील म्हसास (प्रतिनिधी) – “शाळा व्यवस्थापन समिती व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसास” यांच्यातर्फे दिनांक 4 सप्टेंबर रोजी म्हसास शाळेचे आदर्श “माजी मुख्याध्यापक श्री रत्नाकर पाटील सर व उपशिक्षक श्री प्रवीण भालेराव सर” यांची ऑनलाईन संगणकीय बदली झाल्याने त्यांना आज शाळेतर्फे निरोप देण्यात आला.
आजच्या या कार्यक्रमासाठी म्हसास व रामेश्वर गावचे सरपंच,उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच दोन्ही गावातील शिक्षण प्रेमी, लोहारा केंद्र अंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हसास गावचे सरपंच श्री ज्ञानेश्वर पाटील हे होते. प्रास्ताविक म्हसास शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर जाधव सर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्राजक्ता जळतकर मॅडम, महेश रोकडे सर व शिवाजी बोरसे सर या शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली. विद्यार्थी व गावातील शिक्षणप्रेमी यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतर्फे श्री रत्नाकर पाटील सर व प्रवीण भालेराव सर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी दोघेही निरोपार्थी व सत्कारमूर्ती शिक्षकांचे स्वागत केले. तसेच ऑनलाईन संगणकीय बदलीने म्हसास शाळेत नुकतेच रुजू झालेले श्री ज्ञानेश्वर जाधव सर व पंकज पालीवाल सर यांचाही शाळेतर्फे व मान्यवरांतर्फे स्वागत करण्यात आले. सात वर्ष सेवाकाळ बजावताना आलेले अनुभव श्री रत्नाकर पाटील सर व प्रवीण भालेराव सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.भाषणाने सर्व श्रोते गण भावुक झाले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालीवाल सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री शिवाजी बोरसे सर यांनी केले,सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष.सदस्य तथा मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व बंधु भगिनींनी सहकार्य केले

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button