खान्देश

मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी लक्ष्मी मातेची मराठा महासंघाच्या वतीने विधिवत पूजा !

मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी लक्ष्मी मातेची मराठा महासंघाच्या वतीने विधिवत पूजा !

चाळीसगाव (वार्ताहर )येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून नारायणवाडी येथील लक्ष्मी आईचे विधिवत पूजन दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालना अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील हे गेल्या 10-12 दिवसापासून उपोषणास बसले आहे. आपल्या कुटुंबाची परवा न करता समाजासाठी त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव, भगिनी मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करीत आहे. व महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा दिला जात आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या परिवाराची व स्वतःच्या जीवाची परवा केलेली नाही. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभो म्हणून नारायणवाडी येथील लक्ष्मी आईची विधिवत पूजन करण्यात आली. मराठा महासंघाच्या अनिताताई शिंदे यांनी आपल्या मनोगत सांगितले की, राज्य सरकारने मराठा समाजाचा आरक्षणा बाबत तातडीने निर्णय घ्यावा. मराठा बांधव व माता-भगिनी यांचे वर लाठीचार करणाऱ्या पोलिसांना सेवेतून बरतर्फ करावे असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्यात. अन्यथा राज्य सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल. यावेळी मराठा महासंघाचे शहर अध्यक्ष खुशाल बिडे,शहर उपाध्यक्ष कैलास पाटील, शहर सचिव नंदकिशोर जाधव, मराठा महासंघाचे महिला आघाडीच्या अनिताताई शिंदे, मनीषा मनीषा ताई महाजन, रत्नाताई पाटील, रत्नाताई पिलोरे,सीमाताई पवार,छायाताई पनमन,सुमित कापसे,प्रदीप जगताप ,कैलास देशमुख आदी मराठा बांधव व भगिनी उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button