रांजणगांव करांच्या विनंतीची प्राथमिक आरोग्य केंद्राचे चाळीसगांव तालुका वैद्यकीय अधिकारी श्री प्रशांत पाटील यांनी घेतली तात्काळ दखल

रांजणगांव करांच्या विनंतीची प्राथमिक आरोग्य केंद्राचे चाळीसगांव तालुका वैद्यकीय अधिकारी श्री प्रशांत पाटील यांनी घेतली तात्काळ दखल .
चाळीसगाव (प्रतिनिधी) – मागील 2 वर्षांपासून रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांच्यासह ८ रिक्त पदांच्या बाबतीत एक निवेदन जीभाऊ आधार पाटील माजी सरपंच , प्रमोद वसंतराव चव्हाण विद्यमान सरपंच यांचेसह सामाजिक कार्यकर्ते , अनिल नाना पाटील , रावण पांडुरंग वाघ यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले होते .
या निवेदनाची तात्काळ दखल घेत प्रशांत पाटील दिनांक 2 /9/2023 रोजी रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 डॉक्टरांची नेमणूक केली आहे .
यामुळे आता रुग्णालयात रुग्ण तपासणी आणि इतर सर्वच काम सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
आज रोजी रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्वच कर्मचारी बांधवांनी व भगिनींनी दोघेही महिला डॉ भगिनींचे स्वागत केले.
समस्त रांजणगावकरांच्या वतीने प्रशांत पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी वर्गाचे आभार मानण्यात आले .!



