खान्देश

वाडे ते कजगाव डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशीची मागणी.

वाडे ते कजगाव डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशीची मागणी.*
*वाडे येथील ग्रामस्थांचे भडगाव तहसिलदारांना निवेदन.*
*आंदोलनाचा ईशारा

भडगाव  – तालुक्यातील वाडे ते कजगाव डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी. या मागणीचे निवेदन वाडे येथील ग्रामस्थांनी भडगाव तहसिलदार शितल सोलाट यांचेसह इतरञ पाठविण्यात आलेले आहे.
भडगाव तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात* *म्हटले आहे कि, वाडे ते कजगाव या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नुकतेच ग्रामसडक योजनेखाली करण्यात आले आहे. माञ हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. या रस्त्याचे* *डांबरीकरणाचे काम जागोजागी उखडुन गेले आहे. जागोजागी रस्त्यात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे* *दुचाकीवाहनांसह चारचाकी वाहने , बैलगाडी चालविणे कठीण झाले आहे. रस्त्यावर पायी* *वापरणेही मोठया ञासाचे ठरत आहे. रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टयांचे काम सुद्धा पुर्ण केलेले नाही. रस्त्याच्या कामाची ३ महिन्यात झालेली दुरावस्थाही शेतकर्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. या कामाबाबत संबंधित अभियंतांना* *सांगीतल्यावर* *पाऊसाळा संपल्यावर बघु, पाहु अशी* *उडवीची उत्तरे मिळाली आहेत. त्यामुळे* *आम्हाला आपणाकडुन न्यायाची अपेक्षा आहे. तरी रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी. या रस्त्याचे काम नवीन करणेबाबत आपल्या स्तरावर कार्यवाही व्हावी. अन्यथा ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करतील* *याची प्रशासनाने नोंद घ्यावी. असेही शेवटी निवेदनात म्हटलेले आहे. या निवेदनाच्या प्रति कार्यकारी* *अधिक्षक अभियंता नाशिक मंडळ नाशिक, जिल्हाधिकारी* *जळगाव, सार्वजनिक बांधकाम विभाग* *जळगाव आदिंना पाठविण्यात आलेल्या आहेत. हे निवेदन आज दि. १६ रोजी दुपारी भडगाव तहसिल* *प्रशासनासह* *सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात* *आले. यावेळी सुनिल निंबा पाटील, पञकार अशोक महादु परदेशी, लक्ष्मण रुपचंद बोरसे, शाम विनायक पाटील, बापु चिंतामण पाटील, मुकुंदा रामदास माळी सर्व रा. वाडे ता.* *भडगाव,* *प्रमोद विठ्ठल मोराणकर, अविनाश राजाराम मोराणकर रा. गोंडगाव ता. भडगाव आदि ग्रामस्थ हजर होते. या निवेदनावर असंख्य ग्रामस्थांच्या सहया आहेत. यावेळी*
तहसिलदार शितल सोलाट व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकार्यांना निवेदन देऊन सुनिल पाटील, अशोक परदेशी यांच्यासह उपस्थित सर्व नागरीकांना रस्त्याची दुर्देशेबाबत व्यथा मांडत प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी. संबंधित ठेकेदाराला कडक सुचना देऊन रस्त्याचे पुन्हा नव्याने काम करण्यास सुचना दयाव्यात. अन्यथा* *आमच्यासह ग्रामस्थ तिव्र आंदोलन छेडण्याचा मार्ग अवलंबवतील असा प्रशासनाला ईशारा देण्यात आलेला आहे.*

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button