खान्देश

मंगरूळ परिसरात गोतस्करांचा धुमाकूळ : गुरे लंपास तर धुळपिंपरीतूनही गुरांची तस्करी, शेतकऱ्यांत संताप !

मंगरूळ परिसरात गोतस्करांचा धुमाकूळ : गुरे लंपास तर धुळपिंपरीतूनही गुरांची तस्करी, शेतकऱ्यांत संताप !

मंगरूळ (प्रतिनिधी-कैलास पाटील) – मंगरूळ परिसरात गोतस्कर पुन्हा सक्रिय झाले असून काल रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून चार गुरे लंपास करण्यात आली आहेत. यामध्ये तीन गाई व एक बैल असा समावेश असून तस्करांनी आर्टिका वाहनातून ही गुरे चोरून नेल्याची माहिती मिळाली आहे.

गुरांची चोरी झालेल्या ठिकाणी गावाबाहेरील शिवार असून, एका घटनेत हेमराज गंजीधर पाटील यांची तर दुसऱ्या घटनेत समाधान माणिक पाटील यांची गुरे लंपास झाल्याचे समजते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वी धुळपिंपरी परिसरातूनही गोतस्करी झाल्याचे समोर आले होते. तेथील सुरेश साहेबराव पाटील व सोमा साहेबराव पाटील यांची गुरे तस्करांनी लंपास केल्याचे सांगितले जाते.

पशु धन व गोतस्करांचा वाढता धुमाकूळ लक्षात घेता तातडीने कारवाई करून तस्कर चोरट्यांना आवर घालावा, अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे जोर धरत आहे. अद्याप पोलिसात गुन्हा दाखल नाही . कुठे गुरे दिसल्यास पारोळा पोलीस स्टेशन किंवा न्यूज झेप इंडिया शी संपर्क करावा .

 

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button