खान्देश

 पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार ! पूरस्थितीत अनेक गावांचा संपर्क तुटला ! केले नदी पुजन !

 पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार ! पूरस्थितीत अनेक गावांचा संपर्क तुटला ! केले नदी पुजन !

**पाचोरा (प्रतिनिधी):**
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने सातगाव डोंगरी परिसरासह वडगाव (कडे), शिंदाड, वाणेगाव, निंभोरी, राजुरी, वाडी शेवाळे, सार्वे व पिंप्री या गावांमध्ये मोठा कहर केला. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या पावसामुळे दगडी नदीसह परिसरातील नद्या-नाल्यांना पूर आला आणि गावागावांत पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले.

*पूरस्थितीत गावांचा संपर्क तुटला*
इंद्रायणी , बहुळा नदीच्या पूराच्या पाण्याने वाणेगाव, शिंदाड व निंभोरी गावांना सर्वाधिक फटका बसला असून आर्वे, लोहारी, वाडी शेवाळे, राजुरी यांसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक घरांत पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. सातगाव डोंगरीकडून मराठवाड्याकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. नागरिकांनी भीतीपोटी अख्खी रात्र जागून काढली.

*पशुधन वाहून, शेतकऱ्यांचे हाल*
अचानक आलेल्या पुरात शेकडो जनावरे वाहून गेली. या मोठ्या प्रमाणातील पशुधन हानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जनावरे डोळ्यांदेखत पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावले.

लोहारी येथे माता भगिनींनी केले नदीचे जलपूजन :-

रूढी परंपरेनुसार आजही नदीला माता/ आई  मानले जाते. व  नदी पूजन केले जाते त्याप्रमाणे पाण्याचा वाढता प्रभाव पाहता लोककल्याणासाठी कोणाचे काही चुकले ते माफ करावे व सर्व पाप पदरात घ्यावे . असे म्हणत माता भगिनींनी लोहारी खु येथे बहुळा नदीचे हळद कुंकू वाहून श्रद्धेने ओटी भरून पूजन केले.   

दरम्यान, अजूनही पुराची स्थिती कायम असून तातडीने मदतकार्य सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button