खान्देश

पाचोऱ्याचे सुपुत्र सिद्धेश पाटील यांचे लंडनमध्ये यश; डॉक्टर असोसिएशनतर्फे सन्मान

पाचोऱ्याचे सुपुत्र सिद्धेश पाटील यांचे लंडनमध्ये यश; डॉक्टर असोसिएशनतर्फे सन्मान

पाचोरा, दि. १२ (वार्ताहर): येथील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक  दत्ता आबा पाटील यांचे सुपुत्र, सिद्धेश दत्तात्रय पाटील यांनी प्रतिष्ठित ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ येथून फायनान्स विषयात मास्टर डिग्री संपादन करून पाचोरा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल येथील डॉक्टर असोसिएशनतर्फे त्यांचा विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला.

या सत्कार समारंभासाठी शहरातील अनेक नामांकित डॉक्टर्स उपस्थित होते. यामध्ये डॉ. घनश्याम चौधरी, डॉ. अमोल जाधव, डॉ. बाळकृष्ण पाटील, डॉ. भरत पाटील, डॉ. गोरख महाजन, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवन सिंग पाटील, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष  राजेंद्र भोसले यांच्यासह इतरही अनेक मान्यवर डॉक्टरांनी उपस्थित राहून सिद्धेश पाटील यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सिद्धेश पाटील यांनी मिळवलेले हे यश पाचोरा तालुक्यातील तरुण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी असून, त्यांच्यामुळे शहराचा गौरव वाढला आहे, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button