पाचोऱ्यात पोलिसांच्या वारी सेवेला सलाम: निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधील फलक लेखन ठरले चर्चेचा विषय!
पाचोऱ्यात पोलिसांच्या वारी सेवेला सलाम: निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधील फलक लेखन ठरले चर्चेचा विषय!
पाचोरा, ५ जुलै: आषाढी एकादशीच्या निमित्ताने निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी शाळेच्या दर्शनी फलकावर साकारलेले एक सुंदर फलक लेखन सध्या समाज आणि पाचोरा शहरात चर्चेचा विषय बनले आहे. या फलक लेखनातून त्यांनी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांविषयी अनोखी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
कुलकर्णी यांनी आपल्या कलाकृतीतून पोलिसांसाठी लाडक्या विठुरायाची वारी केवळ बंदोबस्तासाठी नसून ती पांडुरंगाची सेवाच असते, हा सुंदर विचार मांडला आहे. पोलिसांविषयीचा आदर आणि कृतज्ञतेचा हा भाव फलक लेखनातून अतिशय प्रभावीपणे व्यक्त झाला आहे.
निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शाळेच्या फलकाचा उपयोग केवळ विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठीच नव्हे, तर त्यांच्यात सामाजिक सलोखा वाढावा आणि सामाजिक जनजागृती व्हावी यासाठीही केला जातो. प्रत्येक सण, विविध उत्सव किंवा सामाजिक विषय घेऊन येथे फलक लेखन केले जाते.
कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांचे हे सामाजिक फलक लेखन पाचोरा शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
या फलक लेखनाची संकल्पना आदरणीय संचालिका वैशालीताई सूर्यवंशी यांची होती, तर शाळेचे प्राचार्य गणेश राजपूत यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन केले.


