राजकीयराष्ट्रीय

मराठवाड्याची राजधानी छ. संभाजीनगरमध्ये ‘बीआरएस’ची 24 एप्रिलला जाहीर सभा, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव राहणार उपस्थित

मराठवाड्याची राजधानी छ. संभाजीनगरमध्ये ‘बीआरएस’ची 24 एप्रिलला जाहीर सभा, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव राहणार उपस्थित !

छ .संभाजीनगर (NZI वृत्तसेवा) – नांदेड जिल्ह्यात झालेल्या पहिल्या सभेनंतर के चंद्रशेखर राव यांनी आता मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

        आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका (Legislative Assembly-Lok Sabha Elections) डोळ्यासमोर ठेवत भारत राष्ट्र समिती (बीआरएस-BRS) पक्षाचे अध्यक्ष तथा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी महाराष्ट्रात आपला पक्ष वाढविण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत.

       नांदेड जिल्ह्यात झालेल्या पहिल्या सभेनंतर के चंद्रशेखर राव यांनी आता मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे 24 एप्रिलला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे. त्यामुळे या सभेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

        महाराष्ट्राच्या  राजकारणात छत्रपती संभाजीनगर शहराचे विशेष महत्व आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या जिल्ह्यात आपला पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतात .  अशातच राज्यात नव्याने एन्ट्री केलेल्या तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस-BRS) पक्षाने देखील संभाजीनगरमध्ये पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. काही दिवसांपूर्वी माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना आणि माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचे पुतणे अभय चिकटगावकर यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच आता 24  एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये बीआरएसची सभा होणार आहे. 

अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे .

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button