पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बैठक संपन्न !

पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बैठक संपन्न
पाचोरा(प्रतिनिधी )- पाचोरा येथे 14 एप्रिल रोजी भव्य दिव्य व हजारोच्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक जनता वसाहत , भारतीया नगर येथून निघत असून या मिरवणुका उत्साहाने व आनंदाने निघतात या मिरवणुका मध्ये सर्व धर्मीय सर्व जातीय सलोख्याचे कार्यकर्ते भाग घेतात . ही मिरवणूक शिवाजीनगर ,जामनेर रोड ,प्रकाश टॉकीज चौक ,आठवडे बाजार, गांधी चौक, या रूट मार्गावर निघत असून यामध्ये प्रोढ , बालगोपाळ मंडळी , महिला वर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसरणीचे सर्व कार्यकर्ते अनुयायी तसेच सामाजिक संघटना पत्रकार बांधव , राजकीय पुढारी सर्वच उपस्थित असतात . डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या उत्साह निमित्त व्याख्यानमाला व जय भीम या गीतावर आधारित गाण्याचा कार्यक्रम घेतला जातो . या मिरवणुकीच्या निमित्त शांतता निर्माण राहावी. याकरिता पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे सर्व मंडळांना बोलून त्यांचे आयोजक व अध्यक्ष कार्यकर्त्यांची बैठक पोलीस स्टेशनला घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी अध्यक्ष स्थानी अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे , पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ , स.पो. निरीक्षक राहुल मोरे , नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले , MSEB चे बबलू आदिवाल, प्रवीण ब्राह्मणे , किशोर डोंगरे , अशोक मोरे , अविनाश सावळे, एडवोकेट रोहित ब्राह्मणे इत्यादींनी काही सूचना मांडल्या यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सर्वांना योग्य सूचना व मार्गदर्शन केले तसेच पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ यांनी कार्यकर्त्यांना शांततेच्या मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी सूचना केल्या यावेळी सर्व मंडळाचे सदस्य व पत्रकार बांधव उपस्थित होते.



