खान्देशताज्या बातम्या

**पाचोरा तालुकास्तरीय ‘मिशन स्कॉलरशिप’ कार्यशाळा उत्साहात संपन्न**

**पाचोरा तालुकास्तरीय ‘मिशन स्कॉलरशिप’ कार्यशाळा उत्साहात संपन्न**

**पाचोरा (प्रतिनिधी)** : इयत्ता चौथी व सातवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा चालू शैक्षणिक वर्षापासून पुन्हा सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने पाचोरा शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय **“मिशन स्कॉलरशिप” कार्यशाळा** उत्साहात पार पडली.

पाचोरा तालुक्यातील विविध शाळांमधील सुमारे **२,४०० विद्यार्थी** यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. या विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळावे आणि परीक्षेची तयारी अधिक परिणामकारक व्हावी यासाठी शिक्षकांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेला **गट शिक्षणाधिकारी विजय पवार**, **शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील**, **शा.पो.आ. अधीक्षक सरोज गायकवाड**, **राजेंद्र पाटील सर** व **सुभाष देसले सर** उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन **संजू राठोड** यांनी केले, तर आभार प्रदर्शन **विजय ठाकूर** यांनी मानले.

**मिशन स्कॉलरशिप समन्वयक सुभाष देसले** यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाची पद्धत तसेच विविध युक्त्या व क्लुप्त्यांबाबत शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी प्रत्येक शाळेत नियमित शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेणे, पर्यावरण शिक्षण व आरोग्य शिक्षणाच्या तासिका आयोजित करणे तसेच असाक्षरांसाठी विशेष वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

शा.पो.आ. अधीक्षक सरोज गायकवाड यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत असलेले महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमात पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल शिक्षक डॉ. मधु गुमाडे, तसेच बंजारा भाषिक अभ्यासक्रम पुस्तिका तयार केल्याबद्दल संजू राठोड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल **राजेंद्र राठोड, विद्या जोशी, दिनेश तेली व चारूलता पाटील यांचाही गौरव करण्यात आला.

दरम्यान, उर्दू शाळेतील रोजेदार विद्यार्थ्यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख कदीर , उर्दू शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

 

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button