जळगांव जिल्हा

प्राथमिक आरोग्य केंद्र लोहारा यांचा भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त. आरोग्य सहाय्यक गैरहजर,हजेरी पत्रकावर मात्र स्वाक्षरी

प्राथमिक आरोग्य केंद्र लोहारा यांचा भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त. आरोग्य सहाय्यक गैरहजर,हजेरी पत्रकावर मात्र स्वाक्षरी

लोहारा – तालुका पाचोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी भेट दिली असता पावसाळा असल्याकारणाने साथरोग आशयासंदर्भात विचारणा केली असता सर्व ग्रामपंचायत स्तरावर पाणी तपासणी,TCL साठा अद्यावत ठेवणे,पाईपलाईन गळती बाबत पत्र देण्यात आले आहेत.औषध साठा दोन ते तीन महिने पुरेल एवढा उपलब्ध आहे याबाबत माहिती मिळाली तसेच साथ रोग पथक तयार करण्यात आले आहे.
मुख्यालयीन कर्मचारी,वैद्यकीय अधीक्षक, औषधी निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, शिपाई सर्व कर्मचारी हजर होते मात्र आरोग्य सहाय्यक श्री दयाराम नेटके हे गैरहजर होते. विचारपूस केली असता ते लसीकरण करिता रजिस्टरला नोंद करून गेले आहेत व हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करून गेले आहेत असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. तात्काळ वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर पाटील यांना कॉल करून त्यांना सविस्तर माहिती सांगितली असता त्यांनी सांगितले की परंतु आज कुठेही लसीकरण सत्र नसल्याने ते विना परवानगी गैरहजर आहेत तसेच सदर कर्मचारी हा वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याशी समन्वय ठेवत नाही, वैद्यकीय अधिकारी यांची परवानगी न घेता मुख्यालय सोडून जातात, प्राथमिक आरोग्य केंद्रातील अहवाल ,ऑनलाइन कामकाज माहिती, लसीकरण कार्यक्रम व मोहीम यात त्यांचा सहभाग नसून त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात अडचणी निर्माण होत आहेत तसेच आधी या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिले असून त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक एक पद आरोग्य सहायिका दोन पद शिपाई एक पद प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही पदे रिक्त आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेखर पाटील यांनी दिली.त्यामुळे सरकारी पगार घेऊन कर्तव्यात कसूर करीत असल्याने सदरील आरोग्य सहाय्यक याची त्वरित बदली करावी अशी मागणी लोहारा ग्रामस्थ तथा माणुसकी रुग्णसेवा समूह सदस्य यांनी केली आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button