अन्य

सोन्या चांदीच्या दागिन्यांसह ४७ हजारांची रोकड चोरी पोलिसात गुन्हा दाखल!

चोपडा (प्रतिनिधी ) – शहरातील एका घरातील खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोपडा पोलीस स्टेशनला चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती वरून, व्यापारी असलेले ज्ञानेश्वर कुंवर (वय ४२) चोपड्यातील रामकुंवर नगर मध्ये राहतात. २२ जुलै च्या पहाटे त्यांच्या घरात अज्ञात चार चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आज प्रवेश करून लोखंडी कपाटातील ४७ हजाराची रोकड, साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे टोंगल, २१ हजाराची सोन्याची अंगठी, अठरा हजारांचे सोन्याचे कानातील टॉप, घड्याळ असा एकूण एक लाख ४६ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला याप्रकरणी ज्ञानेश्वर कुमार यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अनोखी चार इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button