पारोळा बाजार समितीवर मा. आमदार सतीष पाटलांचा डंका तर आमदार चिमणराव पाटलांचा सुपडा साफ !

पारोळा (प्रतिनिधी)- माजी आमदार सतीष पाटलांचा दणका तर शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांना निवडणुकीत केले चारी मुंड्या चीत! पारोळा बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेतून फुटून शिंदे गटात गेलेले आमदार, चिमणराव पाटील यांचा दारुण पराभव करून केला सुपडा साफ ; मतदारांचा गाद्दारीविरोधातला कौल शिंदे गट सेना आमदाराच्या मुलाचे डिपॉझिट जप्त; 18 च्या 18 जागी महाविकास आघाडीचा झेंडा; राष्ट्रवादीचे माजी आमदार सतीश पाटील यांच्यावर विश्वास दाखवत मतदारांनी सत्ताधारी आमदारांना जागा दाखविली; यामुळे येणा-या विधानसभा निवडणुकीत हाच फार्मुला तथा ट्रेंड कायम राहणार असे चित्र दिसत आहे , शिवसेनेतून फुटून निघालेल्या शिंदे सेनेच्या आमदारांना याला सामोरे जावे लागणार असे सुपडा साफ होणार अशी नागरिकांमध्ये जुगल बंदी चर्चा सुरु आहे . !



