शैक्षणिक

पाचोरा पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे प्रमुख नितीन सुर्यवंशी यांचा  वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार

पाचोरा पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे प्रमुख नितीन सुर्यवंशी यांचा  वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार

पाचोरा- पाचोरा पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे प्रमुख  नितीन सुर्यवंशी यांचे चिरंजीव डॉ. कुणाल नितीन सुर्यवंशी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत अशी एम.बी.बी.एस. पदवी घेऊन आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब तसेच गरजू लोकांच्या सेवेसाठी व त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी खर्ची घालणार आहेत.ठाणे येथील सुप्रसिद्ध राजीव गांधी मेडिकल कॉलेजात डॉ. कुणाल यांनी एम.बी.बी.एस. ची पदवी प्रथम श्रेणीत घेऊन नावलौकिक मिळवला.आज डॉ. कुणाल यांच्या वतीने त्यांच्या वडिलांचा शिवसेना कार्यालयात  वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व डॉ. कुणाल सुर्यवंशी यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हा प्रमुख शेतकरी सेना श्री. अरुण पाटील, उप जिल्हाप्रमुख शिवसेना ॲड. पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख शरद पाटील, शिवसेना शहर प्रमुख ॲड.दीपक पा,अनिल सावंत, माजी नगरसेवक भरत खंडेलवाल, उपजिल्हा संघटिका सौ तिलोत्तमा मौर्य, शहर संघटिका मंदाकिनी पारोचे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संदीप जैन, युवा सेना तालुकाप्रमुख भुपेश सोमवंशी, माजी नगरसेवक दत्ताभाऊ जडे, माजी जि. प. सदस्य राजू भैय्या पाटील, शहर समन्वयक दादाभाऊ चौधरी, शहर संघटक राजेंद्र राणा व जितेंद्र जैन, युवा सेना शहर प्रमुख हरीश देवरे, युवा सेना शहर संघटक प्रशांत सोनार, युवा सेना सरचिटणीस जगदीश महाजन, एस. टी. कामगार सेनेचे तालुकाप्रमुख अजय पाटील,ॲड. प्रवीण पाटील योगेंद्रसिंह मौर्य, पप्पू राजपूत, पप्पू जाधव, संजय चौधरी, दादाभाऊ राजपूत, नितीन लोहार, अधिकार पाटील, गुरूलाल पवार, देविदास पाटील, रुपेश पाटील, अभिषेक खंडेलवाल,अतुल चौधरी, बंडू मोरे,खंडू सोनवणे, निलेश पारोचे, कैलास मिस्तरी, अजय पाटील शुभम राजपूत तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी नितीन सुर्यवंशी यांचे अभिनंदन केले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button