भडगाव नगराध्यक्ष पदासाठी एस.टी. (महिला) आरक्षण – शहरात चर्चेचे वातावरण

भडगाव नगराध्यक्ष पदासाठी एस.टी. (महिला) आरक्षण – शहरात चर्चेचे वातावरण
भडगाव (प्रतिनिधी) – छोटे सरकार – राज्य शासनाने जाहीर केलेल्या नगरपरिषद निवडणुकांच्या आरक्षण यादीनुसार भडगाव नगरपरिषदेत यंदा नगराध्यक्ष पदासाठी एस.टी. (महिला) आरक्षण निश्चित झाले आहे. या निर्णयामुळे भडगावच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे.
नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित झाल्याने शहरात एकूण वातावरण शांत आणि सुखद दिसून येत आहे. मात्र, काही नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूरही उमटत आहेत. अनेकांचे मत आहे की, जर ही जागा ओपन किंवा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाली असती, तर शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असते.
दरम्यान, आरक्षणामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. विविध पक्षांनी संभाव्य उमेदवारांच्या शोधाला सुरुवात केली असून, एस.टी. प्रवर्गातील महिलांमध्ये उमेदवारीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
आगामी काही दिवसांत भडगावमधील राजकीय तापमान अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



