खान्देश

भडगांव साई नगर परिसरात रस्ता व्हावा : नागरीकांची मागणी

भडगांव साई नगर परिसरात रस्ता व्हावा : नागरीकांची मागणी
भडगाव (प्रतिनिधी) : भडगांव साईनगर नवीन कॉलनी परिसरात साधा कच्चा रस्ताही नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत. परिणामी पाण्याचे डबके तयार होऊन आरोग्यास धोका निर्माण होत आहे. सदर कॉलनीतील भडगांव नगरपरिषद हद्द गट क्र. 465/2 या भागात रस्त्यावर तात्पुरता मुरूम तरी टाकण्यात यावा. नंतर पक्का रस्ता, गटार सुविधा करण्यात याव्यात. याबाबत नगर परिषदेने लक्ष देऊन नागरिकांचे होणारे हाल थांबवावेत. अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेविका महिला दक्षता अध्यक्षा योजना पाटील सह साहेबराव सोनवणे, शैला माळी, दिपमाला जाधव, संगीता पाटील, ऍड. सुनील सोनवणे, जितेंद्र रायसिंग, प्रमिला सोनवणे, भारती अहिरे, शशिकला गांगुरडे, विठाबाई देसले, संभाजी भोई, स्वाती पाटील, भाग्यश्री पाटील, मीना पंजाबी, संदना सूर्यवंशी, लीला पटेल, सुरेखा महाजन, योगिता पाटील, अनिता मालचे, लक्ष्मण भोई, सुधीर सोनवणे, अभिराज चव्हाण, रेखा सोनवणे, वसुंधरा पवार आदी रहिवाशांनी निवदनाद्वारे मुख्याधिकारी रविंद्र लांडे, नगरअभियंता रणजित पाटील यांचेकडे केली आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button