भडगाव शहराच्या कॉलनी भागातही मदत कक्ष सुरू करा. -अॅड. अमोल पाटील यांनी मागणी.

भडगाव शहराच्या कॉलनी भागातही मदत कक्ष सुरू करा. -अॅड. अमोल पाटील यांनी मागणी.
भडगाव- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीसाठी लाभार्थी महिला भगिनींच्या सोयीसाठी भडगाव नगरपरिषदेच्या वतीने शहराच्या विविध भागात आज दि. १५ जुलै पासून अधिकृत मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. परंतु टोणगाव, भागवत कॉलनी, बाळद रोड परिसर( जुन्या ४ नं.प्रभागातील कॉलनी भाग), शिवाजीनगर,शेजवळकर नगर, ४०गाव रोड परिसर, कोठली रोड परिसर,कराब, वडधे, भवानी माता मंदिर परिसरात नगरपरिषदेच्या वतीने अधिकृत मदत कक्ष सुरू करण्यात आलेले नाहीत.
तरी सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व लाभार्थी महिला भगिनींच्या सोयीसाठी कोणताही दुजाभाव न करता वरील भागात शासनाच्या निर्देश व सूचनेवरून तात्काळ अधिकृत मदत कक्ष सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य तथा माजी नगरसेवक अॅड. अमोल नाना पाटील यांनी केली आहे.



