खान्देश

ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती यात्रा राज्यभर निघणार – अनिल महाजन – ओबीसी नेते,

ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती यात्रा राज्यभर निघणार – अनिल महाजन ,ओबीसी नेते, महाराष्ट्र राज्य.

राज्य सरकारची नियत ही ओबीसी समाजाच्या विरोधात दिसून येत आहे. मराठा समाजासमोर राज्य सरकार झुकताना दिसत आहे. राज्य सरकारला आरक्षणाचे घोंगडे हे भिजवत ठेवायचे आहे. *मराठा-ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम राज्य सरकार मधील काही मंत्री, आमदार करताना दिसून येत आहे. ओबीसी समाज हा शांती आणि संयमी आहे. राज्य सरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ओबीसी तरुणांना मिळालेले हक्काचे आरक्षण काही विशिष्ट समाजाचे लोक हे हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.* राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यात आमचे काही दुमत नाही. त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे त्यांच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा कोणताही विरोध नाही. परंतु ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण ही मागणी पूर्ण चुकीची आहे. या भूमिकेला आमचा शेवटपर्यंत विरोधच असणार आहे.

*ओबीसी जनक्रांती परिषदेचे संस्थापक, अध्यक्ष व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे, प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन हे आपल्या राज्यभरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत आरक्षण बचाव संघर्ष यात्रा काढणार आहेत. अनिल महाजन हे नेहमी ओबीसी-बहुजन समाजासाठी धावून येतात. शोषित-पीडित-वंचितांचा आवाज म्हणून अनिल महाजन यांची राज्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.* ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण वाचण्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई लढण्याची अनिल महाजन यांनी सांगितले आहे.

 

*यात्रेचे नियोजन स्वरूप राज्यभरातील एकूण ३६ जिल्हे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांना ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष यात्रा समिती तर्फे निवेदन देणे.* स्थानिक ओबीसी बांधवांच्या मनात आरक्षणाबाबत *जी भीती निर्माण झाली आहे . त्याकरता त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे, त्यांना मार्गदर्शन करणे, धीर देणे.* जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर जिल्हा पातळीवर पत्रकार परिषद घेणे. जिल्हा पातळीवरील *ओबीसी लोकप्रतिनिधी, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या भेटीसाठी घेणे. या दौऱ्यादरम्यान राज्य सरकारचे पूर्ण लक्ष ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती यात्राकडे वेधणे. जिल्ह्यातील १८ पगड जाती १२ बलुतेदार समाजातील सर्व कार्यकर्त्यांना यात्रेमध्ये सहभागी करणे. असे यावेळी पत्रकात अनिल महाजन यांनी म्हटले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button