खान्देश

पाचोऱ्यात शिक्षकाची शाळेतच आत्महत्या: शिक्षण क्षेत्रात खळबळ

पाचोऱ्यात शिक्षकाची शाळेतच आत्महत्या: शिक्षण क्षेत्रात खळबळ

पाचोरा, महाराष्ट्र: पाचोरा शहरातील सुपडू भादू विद्यालयातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शाळेतील एका शिक्षकाने वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र महाले असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. महाले  हे त्यांच्या हसमुख आणि मनमिळाऊ स्वभावासाठी परिचित होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही घटना शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका वर्गखोलीत घडली.

या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निकुंभ, उपनिरीक्षक योगेश गणगे पाटील, हरीश परदेशी, संतोष राजपूत आणि वाहनचालक संभाजी पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अॅम्ब्युलन्स चालक बबलू मराठे, किशोर लोहार आणि अमोल पाटील यांच्या मदतीने मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेतून खाली उतरवण्यात आला आणि पुढील तपासणीसाठी नगरपालिका दवाखान्यात पाठवण्यात आला आहे.

रवींद्र महाले यांच्यासारख्या मनमिळाऊ व्यक्तीमत्त्वावर अशी वेळ का आली, यामागे नेमके काय कारण आहे, याबाबत पाचोरा पोलीस सखोल चौकशी करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button