खान्देश

शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा – शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली स्तुत्य उपक्रम.

शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा – शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली स्तुत्य उपक्रम.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वर्धापन दिन अत्यंत जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला. या पर्वाला विशेष महत्त्व प्राप्त झाले ते शिवसेना नेत्या मा. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे.कार्यक्रमाची सुरुवात पावन वातावरणात महादेव मंदिरात पूजन, अभिषेक आणि आरतीने करण्यात आली. त्यानंतर शिवसेना कार्यालय परिसरात ध्वजारोहण करून शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. या शुभप्रसंगी मा. वैशालीताई सुर्यवंशी यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की,”आज शिवसेनेवर कठीण वेळ आहे. पण आपल्याला विसरता कामा नये की, संकटात सावरून उभे राहणे हीच खरी शिवसेना!
शिवसेनाप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हे बाळासाहेबांच्या विचारांचे खर्‍या अर्थाने जिवंत रूप आहेत. आज त्यांच्यासोबत उभं राहणं म्हणजे शिवसेनेच्या विचारांनाच बळ देणं आहे.म्हणूनच मी सर्व शिवसैनिकांना आणि जनतेला आवाहन करते की – आपण सर्वजण एकजुटीने उद्धवसाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहूया! असे आवाहन केले. या विशेष दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळांना नोटीस बोर्ड भेट देण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला. उपक्रमाची सुरुवात पाचोरा शहरातील कृष्णराव नगर, सिंधी कॉलनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच भडगाव येथील जय हिंद कॉलनी, टोणगाव, भडगाव येथील शाळांना नोटीस बोर्ड प्रदान करून करण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी ठोस पाऊल उचलण्यात आले. या उपक्रमामुळे समाजसेवेचे आणि शिक्षणप्रेमाचे सुंदर दर्शन घडले. वर्धापन दिनाचे औचित्य साधून उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.याप्रसंगी ॲड. अभय पाटील, योजनाताई पाटील, मनीषा पाटील, द्वारकाबाई सोनवणे, अनिल सावंत, शशिकांत पाटील, मनोज चौधरी, अभिषेक खंडेलवाल, हरीश देवरे, खंडू सोनवणे, चेतन पाटील, माधव जगताप, भैया भाऊ सूर्यवंशी, रतन परदेशी, विजय साळुंखे, राजू चव्हाण, अरुण तांबे, ज्ञानेश्वर चौधरी, सिकंदर तडवी, गजू पाटील, रमेश पाटील, मिथुन वाघ, पंढरी पाटील, एकनाथ महाराज, संजय चौधरी, राजधर आबा, गोविंद पाटील, अकिल शेख, सलीम खान, नितीन महाजन, आवेश खान, नामदेव चौधरी, चेतन पाटील,आवेश खाटीक, अजय तेली,निकित पाटील,आणि अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button