नराधमांस फाशी द्या महिलांचा पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चा

*भडगांव _प्रतिनिधी _(संजय शेवाळे) _नराधमांस फाशी द्या महिलांचा पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चा*.
महिंदळे ता. भडगाव : तालुक्यातील एका गावात गुरुवार रोजी रात्री ६५ वर्षीय वृद्ध मुकी महिला घराच्या ओसरीत एकटी झोपलेली असतांना गावातील राहुल भीमराव सावकारे वय २७ याने आत्याचार केला. भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मागदर्शनाखाली टीमने दोन तासातच आरोपीस जेरबंद केले. पीडितेस न्याय मिळावा म्हणून गावकऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलन केले.
आरोपीस आमच्या स्वाधीन करा व फाशी द्या अशा घोषणा यावेळी गावकऱ्यांनी व महिलांनी दिल्या. पोलीस निरीक्षकांनी गावाकऱ्यांना आरोपीस कठोरातली कठोर शिक्षा कशी होईल असे पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे. त्याला कठोर शिक्षा होणारच व या कुणाचीही गय केली जाणार नाही असे आश्वासन यावेळी आंदोलकांना दिले व आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू देऊ नका शांतता ठेवा असे आवाहन त्यांनी केले.
येथील महिला हि मुकी असल्यामुळे गावातील आपल्या भावांच्या आसऱ्याने राहत होती. हि महिला गेल्या ५० वर्षांपासून एकटी राहत होती. तिला मुलबाळ काहीच नाही. नराधमांने अमानुष पने तिच्यावर आत्याचार केल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते तिच्यावर जळगाव येथे उपचार सुरु आहेत.
प्रतिक्रिया
नराधमांने वृद्ध महिलेवर अतिप्रसंग केला. त्यात ती वृद्ध महिला गंभीर अवस्थेत आहे. तरी त्या नराधमांचा आम्ही माग काढून दोन तासात त्याला जेरबंद केले आहे. त्याला कायद्याच्या चौकटीत राहून विविध कलमे लावून कठोर शिक्षा होण्यासाठी आमचे काम सुरु आहे.
पांडुरंग पवार
पोलीस निरीक्षक भडगाव.



