खान्देश

खाजगी लक्झरी बस व डंपर ची जोरदार टक्कर १५ ते २० प्रवासी जखमी  

खाजगी लक्झरी बस व डंपर ची जोरदार टक्कर १५ ते २० प्रवासी जखमी  !
पाचोरा (प्रतिनिधी)  -जळगाव रोड वरील वावडधा गावा नजीकच्या वळनावर लक्झरी बस आणि डंपर चा भीषण अपघात घडल्याची घटना आज दिनांक 1 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली, पाचोरा – जळगाव प्रवासी ने आन करणारी लक्झरी बस ही पाचोरा येथून प्रवासी भरून जाररगाव चौफुली वरून निघून जळगावच्या दिशेने जात असताना वावळधा गावाजवळील वळणावर जळगाव कडून पाचोरा च्या दिशेने येणाऱ्या डंपर व या बसची जोरदार आमने-सामने धडक झाली, हा अपघात इतका मोठा होता की यात दूरपर्यंत आवाज जाऊन लक्झरी बस एका बाजूने चिरफाडली गेली, यात खाजगी लक्झरी बस चालक वाहक व प्रवासी हे गंभीररित्या जखमी झाले आहेत, लक्झरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, घटना घडली त्यावेळी वावळधा गावातील गावकऱ्यांनी धाव घेत गंभीर जखमींना तात्काळ जळगाव कडील रुग्णालयाकडे रवाना केले आहे. या घटनेत सुमारे 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाले असून , सदर खाजगी मिनी लक्झरी बस त्यावरील चालक व मालक हे वडली गावातील असल्याची माहिती सांगण्यात येत आहेत पाचोरा येथील एकाच घारातील वकिलासह तीन जनाचा समावेश हि असल्याचे सांगण्यात आले . तर या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली होती. जखमींवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काहींनी पाचोरा येथे येऊन उपचार घेतल्याचे कळते.यावेळी हायवे मृत्युंजय दूत व नागरिकांनी मदत केली.यामुळे मात्र होणारी भिषण जीवित हानी टळली.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button