लोहारा विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

लोहारा विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
भारत पाटील (म्हसास प्रतिनिधी ) द शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव सोसायटी द्वारा संचलित डॉ. जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे दिनांक 1/08/ 2024 रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्यधापक एस व्ही शिंदे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक पी एम सुर्वे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यालयाचे पर्यवेक्षक पी एम सुर्वे यांनी केले त्यांनी आपल्या भाषणातून लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी दिलेले योगदान व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची साहित्य संपदा याविषयीची माहिती दिली यानंतर विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी या महापुरुषांच्या जीवनावर आधारित आपले मनोगते सादर केली त्यानंतर शिक्षकांमधून एस एस पाटील सर व व्ही बी इंगळे यांनी आपल्या भाषणातून लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र आंदोलनासाठी केलेले कार्य व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली साहित्य याविषयीची माहिती दिली यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष एस व्ही शिंदे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून देशभक्तीपर गीत सादर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय पी वानखेडे यांनी केले व आभार बी एन पाटील यांनी मानले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



