खान्देश
भडगांव पोलीस स्टेशनच्या वतीने महिला दक्षता अध्यक्षा योजना पाटील यांचा सत्कार…!

भडगांव पोलीस स्टेशनच्या वतीने महिला दक्षता अध्यक्षा योजना पाटील यांचा सत्कार…!
भडगांव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीच्या वतीने महिला दक्षता अध्यक्षा योजना पाटील यांना सामाजिक क्षेत्रासह त्यांच्या विविध सेवाभावी कार्याच्या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त भडगांव पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी योजना पाटील यांचा सत्कार करून यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर प्रंसगी उपनिरीक्षक शेखर डोमाळे, निलेश ब्राह्मणकर सह अधिकारी कर्मचारी वृंद, माजी नगरसेवक मनोहर चौधरी, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष रविंद्र अहिरे, माहिती अधिकार अध्यक्ष राजू शेख आदी मान्यवर उपस्थित होते



