खान्देश

पाचोरा पोलिसांनी वाचवले फाशी घेणा-या व्यक्तीचे प्राण ११२ च्या कॉल ने टळला अनर्थ !

पाचोरा पोलिसांनी वाचवले फाशी घेणा-या व्यक्तीचे प्राण ११२ च्या कॉल ने टळला अनर्थ !

पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार व पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार होमगार्ड कपिल पाटील  यांच्या तत्परतेमुळे फाशी घेणाऱ्या व्यक्तीचे वाचविले प्राण !

पाचोरा (प्रतिनिधी ) –  पाचोरा येथील शंभू नगर मधील राहणारा तरुण व्यक्ती सचिन रामदास वाघ याने आपल्या वैयक्तिक कारणामुळे जीवाला कंटाळून फाशी घेण्याचा निर्णय घेतला त्याने घरात मधून दरवाजा लावला व त्याने पाचोरा पोलीस हेल्पलाइन 112 क्रमांक यावर फोन केला व सांगितले मी काही कारणास्तव आत्महत्या करीत आहे हे ऐकताच ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार यांनी कुठलाही विलंब न लावता आपले वरिष्ठ अधिकारी अशोक पवार यांना सांगितले असता  पो. निरीक्षक अशोक पवार यांनी  ताबडतोब पो.कॉ.विनोद बेलदार व पोलीस गाडीचे ड्रायव्हर  समीर पाटील यांना त्या स्पॉटवर रवाना करायला सांगितले व त्यांनी क्षणाचा विलंब न करता त्या ठिकाणी पोहोचत या व्यक्तीचे घर गाठले असता आतून दरवाजा लावलेला असल्यामुळे  विनोद बेलदार , होमगार्ड कपिल पाटील यांनी आपली पूर्ण ताकद लावून तो दरवाजा तोडला व आत प्रवेश करून त्याला दोरीवर लटकलेला असताना खाली उतरवले व त्याच्यावर योग्य उपचार करून त्याला त्याच्या परिवाराच्या ताब्यात दिले सचिन वाघ यांचे जीवन संपवण्याच्या आतच त्याचा जीव वाचवला तो पूर्णपणे बरा होईपर्यंत पोलीस निरीक्षक अशोक पवार व पो.कॉ.विनोद बेलदार ,  पो.कॉ.समीर पाटील तिथेच थांबले होते. पोलिसांमध्ये ही माणुसकी असते हे यावर सिद्ध होते . पो.कॉ. विनोद बेलदार ड्रायव्हर पो.कॉ समीर पाटील , होमगार्ड कपिल पाटील यांच्या सावधानतेमुळे  आज एकाचे प्राण वाचले त्यामुळे सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button