सौ.सिंधुताई पंडीतराव शिंदे, प्राथमिक शाळेतर्फे आषाढी एकादशी दिंडी वारीचे आयोजन !

सौ.सिंधुताई पंडीतराव शिंदे, प्राथमिक शाळेतर्फे आषाढी एकादशी दिंडी वारीचे आयोजन….

पाचोरा – सौ.सिंधुताई पंडीतराव शिंदे,प्राथमिक शाळेत देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आषाढी वारीचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थी व विद्यार्थिनी वारकरी वेशभुषा करुन दिंडीत सहभागी झाले होते. संस्थेच्या संचालिका ताईसो. सौ.सिंधुताई पंडीतराव शिंदे ,यांच्या हस्ते पूजा व विठ्ठलाची आरती करुन दिंडीला सुरूवात करण्यात आली.

दिंडी पुनगावरोड, सुशिल डेअरी परिसर,निरामय चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक व विवेकानंदनगर मधून परत शाळेत आली. विवेकानंद नगर मध्ये संस्थेचे संचालक सतीशबापू परशराम शिंदे व विजयाताई सतीश शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी चे सपत्नीक पूजा करण्यात आली. तसेच निरामय चौकात सौ.पूजाताई अमोल शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणी चे पूजन करून दिंडी चे दर्शन घेतले. बँड,टाळ व झेंडे व तुळसी घेऊन दिंडी निघाली.उपस्थितांनी विद्यार्थ्यांन च्या दिंडी चे कौतुक केले. दिंडी पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्यध्यापक समाधान माधवराव महाजन सर व सर्व शिक्षक बंधू भगिनींचे सहकार्य लाभले.



