क्राईमखान्देश

पाचोर्‍यात अवैध धंद्यांवर पोलिसांची धाड, वीस हजारांच्या मुद्देमालासह पाच जण ताब्यात!

पाचोर्‍यात अवैध धंद्यांवर पोलिसांची धाड, वीस हजारांच्या मुद्देमालासह पाच जण ताब्यात

पाचोर्‍या  तालुक्यासह शहरात सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत वीस हजारांच्या मुद्देमालासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

पाचो-यात अशीच कारवाई  काहीं हॉटेलवर चाललेल्या आंबट शौकीनांचे अड्डे बनत असलेल्या विविध अवैध व्यवसाय करणा-या निसर्ग रम्य वातावरणात चालणा-या अड्ड्यांवर होण्याची सुज्ञ नागरिकांची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरात सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर सोमवार, 23 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाड टाकली. यावेळी पाच ठिकाणी धाड टाकण्यात आली.
दरम्यान, सट्टा, चक्री खेळविताना व दारू विक्री करताना वीस हजारांच्या मुद्देमालासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. प्रकाश विठ्ठल पाटील , राहुल निकम, राकेश गोवर्धन मोची, सागर दिलीप कानडे, दिनकर धोंडीराम चव्हाण यांना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली. लगेच नोटीस देऊन या आरोपींना सोडण्यात आले.
पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलीस कर्मचारी विश्वास देशमुख, राहुल शिंपी,संतोष राजपूत, संदीप राजपूत ,समीर पाटील, समाधान बोरसे यांनी ही कारवाई केली.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button