डॉ. पा.रा.घोगरे विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र प्रज्ञा शोध परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न.

डॉ. पा.रा.घोगरे विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र प्रज्ञा शोध परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न.
प्रतिनिधी: सतिष पवार
संपर्क. ९५२७७९९३०४
०६ धुळे ग्रामीण (धुळे):- श्री. शि. वि. प्रसारक संस्थेचे डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयामार्फत रसायनशास्त्र प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले. सदर परीक्षेत क.ब.चौ.उ.म.वी. जळगाव अंतर्गत धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातून पंधरा महाविद्यालयातून सुमारे ८१३ परीक्षार्थी परीक्षेस बसले. प्रथम व् द्वितीय वर्ष पदवी वर्गातील विद्यार्थी हि परीक्षा देण्यास पात्र असतात. संस्थेला शंभर वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने शैक्षणिक वर्ष २००५ पासून ही परीक्षा रसायनशास्त्र विभागामार्फत दरवर्षी घेण्यात येते. यंदा हि परीक्षा दिनांक १७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. द्वितीय वर्ष वर्गापर्यंत अभ्यास क्रमावर आधारित शंभर मार्क ची बहुपर्यायी परीक्षा होती. परीक्षेचे बक्षीस वितरण समारंभ नुकताच आयोजन करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या उद्घघाटन प्रमुख पाहुणे श्री किरण कुमार पाटील (उपअधिक्षक,भूमी अभिलेख धुळे) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. एम व्ही. पाटील, प्रमुख अतिथि प्राचार्य डॉ. के. बी.पाटील (सोनगीर महाविद्यालय, धुळे), उपप्राचार्य प्रा. के. एम. बोरसे, (कॅट परीक्षा समन्वयक), डॉ. जे. टी. पवार, (विभाग प्रमुख रसायन शास्त्र विभाग) प्रा. डॉ चेतन पाटील डॉ. प्रा. आर. जी. महाले आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. परीक्षेचा मुख्य हेतू म्हणजे रसायनशास्त्र या विषयाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी तसेच रसायनशास्त्र पदवी पूर्ण झाल्यावर विविध स्पर्धा परीक्षा देता याव्यात तसेच मास्टर्ससाठी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेएएम), सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, एम.एस्सी प्रवेश पात्रता परीक्षा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) आणि नरसी मोनजी इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट (एन एम आय एम एस), भारतीय अंतराळ संशोधन संस्था (आय एस आर ओ) इत्यादि परीक्षांची तयारी व्हावी, प्राचार्य डॉ एम. व्ही.पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ जे.टी. पवार, परीक्षेचे समन्वयक प्रा. के.एम.बोरसे, सहसमन्वयक डॉ. अतुल पाटील, डॉ. भिकन खैरनार, प्रा. अनिल पाटील, डॉ. आर.जी महाले, डॉ एस. एम.कोष्टी, डॉ चेतन पाटील, डॉ. सविता पाटील, डॉ. प्रियांका सिसोदे, डॉ. प्रशांत पाटील, प्रा. प्रदीप पाटील, प्रा. जे. बी. मोरे, प्रा. सतपालसिंग गिरासे, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. कल्पेश पाटील, आदिनी प्रयत्न केले.सदर कार्यक्रमाची प्रस्ताविक उपप्राचार्य प्रा. के. एम. बोरसे यांनी केले तर अहवाल डॉ. जे. टी. पवार यांनी वाचला. सूत्रसंचालन डॉ. बी. जे. खैरनार यांनी केले आभार डॉ . शिवाजी कोष्टी यांनी मानले.या परीक्षेत प्रथम क्रमांक प्रमोद विनायक पाटील (सोनगीर महाविद्यालय), व्दितीय क्रमांक पायल उमेश देशमुख (चोपडा महाविद्यालय) व तृतीय क्रमांक निकीता संतोष पाटील (विज्ञान महाविद्यालय धुळे) यांनी प्राप्त केले.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जावे. दिवसभराचे मिनिट टू मिनिट नियोजन करावे. वेळेचे सुरळीत व्यवस्थापन करुन अभ्यासक्रमातील बारकावे ओळखावे. अभ्यासक्रमातील संबंधित विषयांची माहिती घेऊन त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास करुन आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी तरच यशप्राप्ती होईल, असे प्रतिपादन श्री. किरण कुमार पाटील यांनी कले.
सर्व गुणवंत विद्याथ्यांचे कौतुक संस्थेचे चेअरमन मा बाबासाहेब कुणालजी पाटील (आमदार धुळे ग्रामीण) संस्थेचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब डॉ.एस.टी.पाटील व मा. प्रफुल्लजी सिसोदे, प्रमोदजी पाटील (प्रशासकीय अधिकारी) यांनी केले.



