खा. राहूल गांधींच्या दौर्यामुळे काँग्रेस पक्षात नवचैतन्य-डॉ. दरबारसिंग गिरासे.

खा. राहूल गांधींच्या दौर्यामुळे काँग्रेस पक्षात नवचैतन्य-डॉ. दरबारसिंग गिरासे.
प्रतिनिधी: सतिष पवार
संपर्क. ९५२७७९९३०४
धुळे- भारत जोडो न्याय यात्रेनिमित्ताने देशाचे नेते खा.राहूल गांधी यांच्या दौर्यामुळे काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांमध्ये उत्साह संचारला आहे. महाराष्ट्र काँगे्रसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला धुळे जिल्हयात गतवैभव प्राप्त होणार असल्याची प्रतिक्रीया धुळे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे यांनी दिली आहे.
धुळे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे यांनी आपल्या प्रतिक्रीयेत म्हटले आहे कि, देशाचे नेते खा.राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हयात भारत जोडो न्याय यात्रा दि.12 आणि 13 मार्च रोजी आगमन झाले होते. या दोन दिवसाच्या खा.राहूल गांधी यांच्या दौर्यामुळे काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. खा.राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेला जिल्हयात प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनखाली झालेल्या महिला न्याय हक्क परिषदेला महिलाचा मिळालेला प्रतिसाद ऐतिहासिक होता. या महिला परिषदेत खा.राहूल गांधी यांनी नारी न्याय ग्यारंटी जाहिर केल्याने केंद्रात इंडीया आघाडीचे सरकार आल्यावर निश्चितच त्याची अंमलबजावणी होवून नारी शक्तीचे सक्षमीकरण व सबलीकरण होणार आहे. केेंद्रातील व राज्यातील सरकारबद्दल जनेतेमध्ये प्रचंड रोष आहे. वाढती महागाई घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेलचे वाढणारे भाव यामुळे जनता होरपळून निघाली आहे. युवकांना नोकरी आणि उद्योग व्यवसाय नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भाजपा सरकारविषयी युवकांमध्ये संताप आहे. शेतकर्यांच्या शेतीमालाला भाव नाही. कांदा आणि कपाशी मातीमोल भावाने विकावी लागली आहे. दुष्काळ आणि नैसर्गिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला असून कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे राज्य व केंद्रातील सरकारबद्दल शेतकर्यांमध्येही नाराजी आहे. त्यामुळे देशात इंडीया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. खा.राहूल गांधी यांच्या दौर्यामुळे काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाचाच खासदार निवडून येईल असा विश्वास तालुकाध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेसह येणार्या विधानसभेतही इंडीया आघाडी आणि महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.



