संत तुकोबारायांचे विचार संपूर्ण मानवजातीला प्रेरणादायी.. ह.भ.प अविनाश महाराज.

पाळधी येथे संत तुकाराम महाराज बीजोत्सव उत्साहात.
संत तुकोबारायांचे विचार संपूर्ण मानवजातीला प्रेरणादायी.. ह.भ.प अविनाश महाराज.
पाळधी ता जामनेर येथे संत तुकाराम महाराज वाणी उत्सव समिती व ग्रामस्थातर्फे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बिजोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला हरिभक्त परायण अविनाशजी महाराज नाचनखेडेकर ,मा.सभापती नीता पाटील, परीट महासंघ जळगाव जिल्हाध्यक्ष रमेश लिंगायत, माजी सरपंच कमलाकर पाटील,युवा नेते विश्वजीत पाटील,ग्रामपंचायत सदस्य देवचंद परदेशी, मनोज नेवे,समाजसेवक गजानन क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सर्व मान्यवरांचा रुमाल,टोपी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तृप्ती वाणी, रोशनी वाणी, अभिषेक वाणी, कांचन चौधरी, दिशा परदेशी, विवेक वाणी, हितेश वाणी. यांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रत्येक विद्यार्थ्याला मान्यवरांकडून शालेय साहित्य सप्रेम भेट देण्यात आले.
हरिभक्त परायण अविनाश जी महाराज यांनी आपल्या मनोगतात संत तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र सोपे आणि सरळ भाषेमध्ये सांगितले व सर्व श्रोते यावेळी मंत्रमुग्ध झाले होते. मान्यवरांमधून कमलाकर पाटील, रमेश लिंगायत, विश्वजीत पाटील, मनोज नेवे, यांनी आपली मनोगत व्यक्त केली.तसेच संध्याकाळी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून दिंडी सोहळा विठ्ठलाचा व तुकाराम महाराजांचा जयघोष करीत टाळ मृदंगाच्या गजरात पार पडला.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश वाणी, जनार्धन वाणी सिताराम वाणी,गोविंद वाणी,संजय वाणी,अंकुश वाणी,अनिल वाणी,सुरेश वाणी, रवींद्र वाणी, बद्रीनाथ वाणी, समाधान वाणी, मुरलीधर वाणी, गोकुळ वाणी, मयूर वाणी, निशांत वाणी, रुपेश वाणी, प्रवीण वाणी, श्याम वाणी, राधेश्याम वाणी, विजय वाणी, गोपाल वाणी, संतोष वाणी , भूषण वाणी,गणेश वाणी, प्रमोद वाणी, सौरभ वाणी,आकाश वाणी,सागर वाणी, प्रसाद वाणी,राहुल वाणी तसेच महिला मंडळ व संत तुकाराम महाराज वाणी उत्सव समिती व ग्रामस्थ मंडळी यांनी परिश्रम घेतले. या सुंदर अशा कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपेश वाणी,सूत्रसंचालन गजानन क्षीरसागर व आभार प्रदर्शन प्रमोद वाणी यांनी मांडले.



