क्राईम

चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी !

दिवसेंदिवस बलात्कार, अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होतांना दिसत असतांना चालत्या ट्रेन मध्ये एका ३० वर्षीय युवतीवर जबरी बलात्कार करण्यात आला, आरोपी २२ वर्षीय युवकाने तब्बल ३ वेळा बलात्कार केल्याची घटना सतना येथून उघडकीस आली असून अर्धनग्न अवस्थेत तीने जीव मुठीत धरून प्लॅटफार्मवर उडी मारली व उभ्या असलेल्या एका आरपीएफ जवानाला आपबीती सांगितल्या नंतर त्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार पकरिया स्थानक ते मेहर रेल्वे स्थानकादरम्यान ४० किमीचे अंतर आहे. या दरम्यान महिलेवर तीन वेळा बलात्कार करण्यात आला. पीडितीने तक्रारीदरम्यान सांगितले की, जेव्हा ती पॅसेंजर ट्रेनमध्ये होती, तेव्हापासूनच आरोपी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण तो तिच्यामागे एसी ट्रेनमध्ये येईल, याची तिला कल्पना नव्हती. एसी कोचमध्ये गेल्यानंतर आरोपीने मागून डोक्यावर जोरदार फटका मारल्यामुळे ती खाली कोसळली आणि आरोपीने तिच्यावर दुष्कृत्य केले.

सतना रेल्वे पोलिस अधिकारी एलपी कश्यप यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला एका पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करत होती, तिला सतना जिल्ह्यातील उचेहरा येथे जायचे होते. पॅसेंजर ट्रेन पकरिया रेल्वे स्थानकात उभी असताना समोरच्या प्लॅटफॉर्मवर एक मोकळी एसी ट्रेनही उभी होती. महिलेला प्रसाधनगृहाचा वापर करायचा असल्यामुळे ती समोरच्या ट्रेनमधील प्रसाधनगृहाकडे गेली. या दरम्यान पॅसेंजर ट्रेनमध्ये असलेला आरोपी तिचा पाठलाग करत मागे मागे गेला.

पाण्याच्या बहाण्याने केली सुटका 

पीडित महिलेने आरोपीकडे पाणी प्यायचे आहे, पाणी पाहिजे असं सांगितलं त्यावेळी आरोपी पाणी आणण्यासाठी स्थानकावर उतरला असताना पीडितेने अर्धनग्न अवस्थेत तिथून पळ काढत स्वतःची सुटका केली दरम्यान स्टेशनवर उपस्थित असलेल्या आरपीएफ जवानाला सदर हकीकत सांगून पीडितेने आरोपीला पकडण्याची विनंती केली. आरपीएफ जवानाने ट्रेनमध्ये धाव घेत आरोपीचा माग काढला,ट्रेन जेव्हा रिवा स्टेशनवर थांबली तेव्हा रात्री ११.३० वाजता आरोपीला अटक करण्यात आली.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button