खान्देश

मैत्रेय ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी सरकारने कार्यवाही करावी-आ.कुणाल पाटील.

मैत्रेय ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी सरकारने कार्यवाही करावी-आ.कुणाल पाटील.
प्रतिनिधी – सतिष नामदेव पवार
संपर्क. ९५२७७९९३०४
धुळे- धुळे जिल्हयासह महाराष्ट्रातील असंख्य ठेवीदारांचे पैसे मैत्रेय गृप ऑफ कंपनीने पैसे बुडविले आहेत. ठेवीदारांचे परताव्याची रक्कम वितरीत करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश समितीला द्यावेत अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत केली.
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. अधिवेशनात आज दि.13 डिसेंबर रोजी धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून धुळे जिल्हयासह राज्यातील मैत्रेय ठेवीदारांच्या झालेल्या फसवणूकीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, मैत्रेय गृप ऑफ कंपनीने राज्यातील सुमारे 2 कोटी 16 लक्ष नागरीकांचे एकूण 2600 कोटी रुपये बुडविले आहेत. सदर कंपनी सन 2009 पासून मैत्रेय गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच या कंपनीची कार्यालयेही बंद झाली आहेत. मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ पी.क्र.1361/18 दि.8 एप्रिल2019 अन्वये एमपीआयडी कायद्यानुसार ठेवीदारांना राज्य शासनाकडून परताव्याची रक्कम वितरीत करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे. त्यामुळे सदर समितीला राज्य सरकारने ठेवीदारांचे पैसे परत करणेसाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केली.आ.पाटील यांनी मैत्रेय ठेवीदारांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न उपस्थित केल्याबद्दल असंख्य ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button